‘तळीरामां’साठी खुशखबर ! ‘इथं’ सुपरमार्केट आणि मॉल्समध्ये मिळणार 24 तास दारू

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील मॉलमध्येच आता दैनंदिन वस्तूंसोबतच दारु खरेदी करण्यचीही सुविधा दिली जाणार आहे. योगी सरकार यासंदर्भातील प्रस्तावावर विचार करत आहे. सूत्रांनी याबाबत माहिती दिली आहे. बिहारमध्ये दारूबंदीमुळे मद्यपींना वाईट बातमी मिळाली आहे. तर उत्तर प्रदेशात मात्र मद्यपींसाठी ही दिलासा देणारी बाब आहे.

असं सांगितलं जात आहे की, आता शॉपिंग मॉल्स आणि सुपरमार्केटमध्ये दारूची विक्री केली जाणार आहे. ज्यात प्रामुख्याने महागडी दारू आणि इंग्लिश दारू यांचा समावेश असेल. उत्पादन शुल्क विभागातील विश्वासू सूत्रांनी माहिती दिली आहे की, या बाबतचा पूर्ण प्रस्ताव तयार झाला आहे. असंह म्हटलं जात आहे की, यामुळे महसूलवाढीसाठी मदत मिळणार आहे. अशीही माहिती आहे की, निर्णयांची अंमलबजावणी करण्यापूर्वी याची विभागीय चाचणी सुरु केली आहे. या निर्णयानंतर लवकरच पूर्ण तयारीसह त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

MP सरकरानं केली 24 तास दारूची सोय

मध्य प्रदेश सरकारनं आता तिजोरी भरवण्यासाठी नवी युक्ती शोधून काढली आहे. सूत्रांचं म्हणणं आहे की, सरकारी महसूल वाढवण्यासाठी आता मध्य प्रदेशात 24 तास दारू मिळेल अशी सोय केली जात आहे. इंदोरपासून याची सुरुवात केली जाणार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनुसार, शहरातील काही निवडक हॉटेलांमध्ये 24 तास दारू विकण्यासठी परवानगी देण्याचा विचार केला जात आहे. असं सांगितलं जात आहे की, कमलनाथ सरकारनं अनेकदा कर्ज घेतलं आहे. अलीकडेच त्यांनी पुन्हा 1000 कोटींचं कर्ज घेतलं आहे. हेच कारण आहे की, सरकारच्या सर्व विभागांना महसूल वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत ज्याची तयारी प्रत्येक विभाग आपापल्या पद्धतीने करत आहे.

असिस्टंट कमिश्नर म्हणाले…

उत्पादन शुल्क विभागाचे असिस्टंट कमिश्नर म्हणाले, “देशातील अनेक शहरात 24 तास दारू विकण्यासाठी लायसन्स देण्यात आलं आहे. यात इंदोर शहराचाही समावेश आहे. मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी म्हटलं जाणारं इंदोर आता आयटी हब म्हणूनही ओळखलं जातं. शहरात अनेक कॉल सेंटर्स आणि आयटीशी संबंधित ऑफिसेस रात्रभर सुरू असतात. रात्री उशीरा खाण्यापिण्याची गरज असते. हेच लक्षात घेऊन उत्पादन शुल्क विभागाचा या प्रस्तावावर विचार सुरू आहे की, शहरातील काही निवडक हॉटेल्समध्ये 24 तास दारू विकण्यासाठी परवानगी दिली जावी. यामुळे सरकारला अतिरीक्त उत्पन्नही होईल आणि लोकांना सुविधाही मिळेल.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/