व्हिडिओ कॉलवर केला साखरपुडा; आता लग्नानंतर अ‍ॅक्टिंग सोडणार उडान फेम अ‍ॅक्ट्रेस !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   टीव्ही शो उडान फेम अ‍ॅक्ट्रेस शीतल पांडे (Sheetal Pandey) आपल्या लग्नामुळं सध्या चर्चेत येताना दिसत आहे. अलीकडेच तिनं कोर्ट मॅरेज केलं आहे. तिनं तिचा लहानपणीचा मित्र अभिषेक भट्टाचार्य सोबत लग्न केलं आहे.

आता 20 नोव्हेंबर रोजी ती ट्रॅडिशनल पद्धतीनं लग्न करणार आहे. अशात आता अशी माहिती समोर येत आहे की, ती लग्नानंतर अ‍ॅक्टिंग सोडणार आहे.

एका इंग्रजी वृत्तानुसार, शीतल म्हणाली, आम्ही 13 नोव्हेंबर रोजी कोर्ट मॅरेज केलं आहे. कारण आम्हाला विजा फॉर्मेलिटीजसाटी मॅरेज सर्टिफिकेट हवं होतं. आम्ही लेस्टरला (Leicester) शिफ्ट होणार आहोत.

20 नोव्हेंबर रोजी लग्न केल्यानंतर आम्ही तिच खरी लग्नाची तारीख मानणार आहोत. हे पूर्ण रितीरिवाजानं होणार आहे. हे लग्न मुंबईतील गोरेगावमधील 5 स्टार हॉटेलमध्ये होणार आहे. मी बंगाली ब्राईड बनणार आहे.

अभिषेक डॉक्टर आहे आणि शीतल त्याच्यासोबत मूव्ह होण्यासाठी तयार आहे आणि आनंदीही आहे. ती टीव्हीमधील अ‍ॅक्टिंगला गुडबाय करण्याचा प्लॅन करत आहे. यानंतर ती डान्स शिकायला आणि शिकवायला सुरुवात करणार आहे.

याशिवाय तिला स्क्रीन रायटिंग वर्कशॉप्सही घ्यायचे आहेत. ती म्हणते, मी आता इंडियात नसेल त्यामुळं डेली सोपमध्ये अ‍ॅक्टिंग सुरू ठेवता येणार नाही. परंतु मी दुसरे मीडियम एक्सप्लोर करणार आहे.

शीतलनं डिजिटल साखरपुडा केला होता. तिला खरं तर यासाठी यूएसला जायचं होतं, परंतु कोरोनामुळं ते शक्य झालं नाही. तिनं व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून साखरपुडा केला.

 

You might also like