उदयनराजे भोसलेंची भाजपमध्ये देखील तीच हटके ‘स्टाईल’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षाचा पश्चिम महाराष्ट्र मेळावा पार पडला. यावेळी भाजपमध्ये नुकताच प्रवेश केलेले हर्षवर्धन पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील आणि धनंजय महाडीक उपस्थित होते. मात्र राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये आलेले साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी या कार्यक्रमाला दांडी मारली.

उदयनराजे हे आपल्या हटके स्टाईल आणि बेधडकपणासाठी ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते त्यावेळी त्यांनी पक्षातील नेत्यांसह पक्षनेतृत्वावर तोफ डागली होती. तसेच अनेकवेळा पक्षशिस्तीचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. अशातच भाजपचे कार्यकारी अध्यक्ष घेत असलेल्या महत्वाच्या मेळाव्याला ते गैरहजर राहिले. त्यामुळे उदयनराजे यांनी भाजपला सरप्राईज दिले अशी चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी होती.

खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर साताऱ्यासह इतर ठिकाणच्या राष्ट्रवादीचे कार्य़कर्ते आक्रमक झाले. लोकसभा निवडणुकीमध्ये उदयनराजे भोसले यांच्या उमेदवारीला विरोध होता. मात्र, सर्वांचा विरोध झुगारून शरद पवार यांनी उदयनराजे यांना उमेदवारी दिली. निकालानंतर अवघ्या तीन महिन्यात राजीनामा देऊन उदयनराजे भाजपमध्ये गेल्याने पक्ष का सोडला अशी विचारणा राष्ट्रवादीकडून केली जात आहे.

Visit : policenama.com