५६ पक्षच काय ५६ पिढ्या जरी खाली उतरल्या तरी ‘परभणी’वरील भगवा खाली उतरणार नाही

परभणीत शिवसेना पक्षप्रमुखांची गर्जना

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन -(ऋषीकेश करभाजन) युतीला हरवण्यासाठी आघाडीमध्ये ५६ पक्ष एकत्र आले आहेत. ५६ पक्षच काय तुमच्या ५६ पिढ्या जरी खाली उतरल्या तरी परभणीवरील भगवा खाली उतरणार नाही. असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. ११ एप्रिल रोजी देशातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता १८ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. याचदरम्यान परभणी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आघाडी सरकारच्या काळामध्ये राष्ट्रवादीने शेण घोटाळा केला होता. पाच वर्षांपूर्वी यांनी केलेल्या घोटाळ्यांवर मी एक पुस्तकच प्रकाशित केले होते. लोकं विसरली असतील. पण या आघाडी सरकारच्या घोटाळ्यांचे वर्णन करायला. बाराखडीही कमी पडेल. असे उद्धव ठाकरे यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणतात की उद्धव ठाकरे वारा येईल तशी दिशा बदलतात. आहो याच वाऱ्यामुळे माझा भगवा ध्वज डौलाने फडकत आहे असा टोलाही त्यांनी शरद पवार याना लगावला. याचबरोबर, युतीला हरवण्यासाठी आघाडीमध्ये ५६ पक्ष एकत्र आले आहेत. ५६ पक्षच काय तुमच्या ५६ पिढ्या जरी खाली उतरल्या तरी परभणीवरील भगवा खाली उतरणार नाही असेही त्यांनी म्हंटले.

तसेच, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सावरकरांना डरपोक बोलतात. म्हणून राहुल गांधींना सांगतोय की हा हिंदुस्तान आहे हा इटली नाहीये. राहुल गांधी तुम्ही आयुष्यात कधी पंतप्रधान होणार नाही. काँग्रेस जर क्रांतिकारकांना देशद्रोही बोलतोय. अशा कपाळकरंटकाना हा देश देऊ नका असे आवाहनही त्यांनी केले.

याचबरोबर, गेली कित्तेक वर्षांपासून माझा शिवसैनिक दुष्काळग्रस्तांना मदत करतोय आणि तेव्हा राष्ट्रवादीवाले घराच्या आत दरवाजा लावून बसले होते. शेतकऱ्यांसाठीच्या जाचक अटी याचा पाठपुरावा करून त्या शिवसेनेने काढून टाकल्या आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला. इतकेच काय तर खास संजय जाधव यांनी ६०० गरिबांची लग्ने लावली आहेत. तर आमदार राहुल पाटील यांनी एक लाखापेक्षा वर जनतेची आरोय तपासणी केली. तसेच हजार पेक्षा जास्त लोकांचे ऑपरेशन केले. परभणी हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे दरवेळेस प्रमाणे यावेळसही शिवसेनेला निवडणून द्या असे आवाहनही त्यांनी केले.