Uddhav Thackeray | ‘मोगॅम्बो खुश हुआ’, नाव चिन्ह गेल्यावर उद्धव ठाकरेंचा अमित शाह यांच्यावर घणाघात

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (Shivsena Party Name) आणि धनुष्यबाण चिन्ह (Dhanushyaban Symbol) शिंदे गटला (Shinde Group) मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजप (BJP) आणि केंद्रातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. रविवारी उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला संबोधित करताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांचे नाव न घेता टीका केली. काल पुण्यात कोणी आलं होतं (अमित शाह), त्यांनी विचारलं महाराष्ट्रात कसं काय सुरु आहे. त्यानंतर ते म्हणाले आज खूपच चांगला दिवस आहे. कारण शिवसेनेचे नाव आणि चिन्ह आपल्यासोबत जे गुलाम आले आहेत, त्यांना दिलं. तर ते म्हणाले खूपच छान, मोगॅम्बो खुश हुआ, अशा शब्दात ठाकरे यांनी टीका केली.

 

ADV

अमित शाह यांच्यावर निशाणा साधताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाल, हे मोगॅम्बो आहेत. तुम्ही मिस्टर इंडिया चित्रपट (Mr. India Movie) आठवला तर त्या मोगॅम्बोला हेच पाहिजे असतं. देशात आपापसात लढाई व्हावी. लोक आपसात लढत राहिले, तर मी राज्य करेन. आजचे मोगॅम्बो हेच तर आहेत. हिंदू असाल तरी लढा, आमच्यासोबत जे आहेत, तेच आमचे. हिंदू असो वा दुसरा कोणी काही फरक पडत नाही. तुम्ही आमच्या पक्षात आला तरच तुम्ही हिंदू, नाही तर तुम्ही हिंदूत्व सोडलं. अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो, कुठ माझं चुकलं. मी कधी आपसात भांडण लावली? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

भाजपने मला काँग्रेससोबत ढकललं
राज्यातील महाविकास आघाडीबाबत (Mahavikas Aghadi) बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मी काँग्रेससोबत (Congress) गेलो नाही,
तर भाजपने मला ढललं आहे. मला हे यासासाठी सांगावेसे वाटते की, तुमच्या मनात कोणताही गैरसमज राहू नये.
2014 मध्ये मी युती तोडली नव्हती. भाजपने युती तोडली होती. त्यावेळी मी हिंदू होतो, आजीही मी हिंदू आहे.
त्यामुळे तुम्ही युती तोडली, नंतर शेवटी त्यांना आमची गरज लागल्याचे ठाकरे म्हणाले.

 

Web Title :- Uddhav Thackeray | ‘Mogambo Khush Hua’, Uddhav Thackeray attacked Amit Shah after the name sign was lost

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bhumi Pednekar | भूमीच्या ‘त्या’ लूकमुळे नेटकऱ्यांनी केले ट्रोल; म्हणाले – ‘कोणीतरी हिला चांगला डिझाईनर द्या….’

Pune News | कैद्यांना नातेवाईकांशी महिन्यातून 3 वेळा बोलता येणार, कारागृह प्रशासनाचा निर्णय

Avadhoot Gupte | ‘या’ कारणासाठी ‘झेंडा’ चित्रपटानंतर स्वतः बाळासाहेबांनी अवधूत गुप्तेला केला होता फोन