Uddhav Thackeray On BJP | शरद पवारांसह उद्धव ठाकरे दिल्लीत, महारॅलीपूर्वी केला भाजपावर खळबळजनक आरोप

नवी दिल्ली : Uddhav Thackeray On BJP | दिल्ली मद्य धोरण (Delhi Liquor Scam) घोटाळ्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीने केलेल्या अटकेच्या कारवाईविरोधात इंडिया आघाडीने आज दिल्लीत लोकतंत्र बचाओ महारॅली काढली आहे. या रॅलीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहेत. या रॅलीपूर्वी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपावर गंभीर आरोप केले.

उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक रोख्यांमध्ये भाजपा मोठा लाभार्थी आहे. यामध्ये अनेक अशा कंपन्या आहेत, त्यांच्यावर धाडी टाकल्या. त्यानंतर भाजपाला निवडणूक रोखे मिळाले आणि त्यानंतर त्याच कंपन्यांना अनेक कंत्राटे मिळाली. हे बिंग फुटल्यानंतर लक्ष विचलित करण्यासाठी केजरीवाल यांना अटक करण्यात आली, असा खळबळजनक आरोप ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे म्हणाले, देशातील हुकुमशाही विरोधात एकत्र येण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मुंबईत मला भेटण्यासाठी आले होते. यावर आमची चर्चादेखील झाली होती. पण, ऐन निवडणुकीच्या तोंडावर हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्यानंतर केजरीवाल यांना अटक करण्यात आली. आपल्याकडे हुकुमशाही येईल अशी भिती नाही, तर हुकुमशाही आलेली आहे. अनेक व्यक्ती अशा आहेत, त्यांच्यावर भाजपाने आरोप केले होते. त्यानंतर त्यांनाच पक्षात घेत त्यांच्यावरील केस रद्द केल्या.

भाजपावर आरोप करताना उद्धव ठाकरे म्हणाले, जे लोक भाजपाच्या विरोधात बोलतात,
त्यांच्यावर केस टाकल्या जातात आणि तुरुंगामध्ये बंद केले जाते. ही चांगली लोकशाही नाही.
या हुकुमशाहीचा सामना आम्ही जनतेसमोर येऊन करणार आहोत. याबाबत सर्वांच्या मनात संताप आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात ज्या प्रकारे गद्दारी करून महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi Govt.) पाडले.
त्यानंतर गद्दारी करून सरकार स्थापन करण्यात आले. भाजपाने सगळ्या चित्र-विचित्रांना बरोबर घेण्याचे काम सुरू केले आहे.
आता भाजपाकडचे जे ठग आहेत, त्यांच्यावरील केस मागे घेतल्या.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime Court News | WhatsApp द्वारे हॉटेलमध्ये चालवल्या जाणाऱ्या बालेवाडी येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट मधील आरोपीला न्यायालयाकडून जामीन मंजूर

Supriya Sule On BJP | सुप्रिया सुळेंचा भाजपावर गंभीर आरोप, भाजपाने आमचे घर फोडले, मोठ्या भावाची बायको आईसारखी…

Chhagan Bhujbal | छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा लढवणार?