Uddhav Thackeray On Dhananjay Munde | करुणा मुंडे प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा धनंजय मुंडेंना टोला, ”तुम्ही आधी एक घरात थांबून हेच माझे…”

मुंबई : Uddhav Thackeray On Dhananjay Munde | अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. त्यावर राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी उद्धव ठाकरे सरकारमध्ये असताना घरी बसून कारभार करत होते, आम्हाला जास्त बोलायला लावू नका, असा इशारा दिला. यावर उद्धव ठाकरे यांनी करूणा मुंडे प्रकरणावरून त्यांना खोचक टोला लगावला आहे. (Uddhav Thackeray On Dhananjay Munde)

उद्धव ठाकरे म्हणाले, धनंजय मुंडेंनी कुठल्यातरी एका घरात बसावे आणि सांगावे की हेच माझे घर आहे. तिथून तरी त्यांनी कारभार करावा. (Uddhav Thackeray On Dhananjay Munde)

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शेतकऱ्यांवर आलेल्या संकटावर बोलण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती.
यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, जबाबदारी घेतली आहे, तर जबाबदारी पार पाडा.
शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा. पंचनामे करत बसण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी द्या, नाहीतर नुकसान भरपाई द्या, माझ्या बळीराजाला न्याय द्या.

उद्धव ठाकरे म्हणाले, प्रधानमंत्री फसल योजना हा घोटाळा आहे. पारदर्शकता असेल तर विम्याचे पैसे गेले कुठे?
शेतकऱ्यांना आधार देताना उद्धव ठाकरे म्हणाले, दुःखात खचून जाऊ नका, शिवसेना नेहमी तुमच्यासोबत आहे.
या सरकारने सगळेच विकायला काढले आहे. तुम्ही अवयव विकण्याचा अविचार मनात आणू नका.

शेतकऱ्यांना आवाहन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, बळीराजा बांधवांनो एकत्र या. घटनाबाह्य सरकारला अन्नदात्याची
ताकद दाखवून द्या. दुसऱ्याकडे धुणीभांडी करायला जाणारे राज्यकारभारासाठी नालायक आहेत.
हे सरकार सगळेच विकत आहे. पंचनाम्याचा खेळ थांबवा, सरसकट मदत द्या, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Jitendra Awhad On Ajit Pawar | शरद पवारांना संपवण्याची त्यांनी सुपारी घेतलीय, कालपर्यंत दैवत…, आव्हाडांचा अजित पवारांवर थेट आरोप

Ajit Pawar On Sharad Pawar | अजित पवारांनी सांगितला पक्षफुटीचा पडद्यामागील घटनाक्रम, शरद पवारांवर केला ‘हा’ आरोप

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी चिंचवड शहरात बनावट ‘पॅराशूट’ तेलाची विक्री, व्यवसायिकावर गुन्हा

Ajit Pawar On Baramati Lok Sabha | बारामती लोकसभा लढवण्याची अजित पवारांची घोषणा, आव्हानानंतर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया

Pune Crime News | कमी रकमेच्या वीजबिलासाठी परस्पर वीजमीटर बदलले, दोन तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल