Uddhav Thackeray | ‘…तर मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देईन’ – CM उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray | विधानपरिषद निवडणुकीच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप आणणारं बंड शिवसेनेच्या एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) पुकारलं आहे. भाजप (BJP) सोबत युती करा असं आव्हान एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलं आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. या सर्व घडामोडीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे प्रतिक्रिया दिली आहे.

 

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, “मला कोणताही मोह नाही, मी राजीनामा द्यायल तयार आहे. परंतु, ज्यांना मी नकोय त्यांनी माझ्या समोर येऊन बोला. समोर येऊन बोललात तर संध्याकाळी देखील राजीनामा देतो. असं ते म्हणाले. मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुख सोडायला तयार आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंद आहे. पण समोर येऊन सांगा… मी आव्हानांना तोंड देणारा माणूस असल्याचं,” उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

दरम्यान, “एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर पाळत ठेवण्यात आली होती, ही कसली लोकशाही ?” अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
तसेच, काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणाले असते की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको तर ठिक आहे.
मला दु:ख झाले. पण माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री नको असेल तर काय बोलावं. सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर सांगावं.
तुम्ही नालायक आहात, तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको, असं तोंडावर सांगावं,” असं ते म्हणाले.

 

Web Title :- Uddhav Thackeray | then I will resign as Chief Minister CM Uddhav Thackeray maharashtra political crisis shivsena leader eknath shinde

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा