Uddhav Thackeray | ‘काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले म्हणता, मिंधेंसह नितीशकुमरांचं तुम्ही काय चाटलं?’, उद्धव ठाकरेंचा अमित शहांना सवाल (व्हिडिओ)

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीची (MVA Vajramuth Sabha) आज छत्रपती संभाजीनगर येथे सभा झाली. वज्रमूठ सभेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. सत्तेसाठी मी काँग्रेस (Congress) राष्ट्रवादीचे (NCP) तळवे चाटत होतो, तर तुम्ही सत्तेसाठी मिध्यांचं काय चाटत आहात? असा थेट सवाल उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी अमित शहांना केला.

 

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आपल्या भाषणात म्हणाले, आपण छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि संभाजी महाराजांचं (Sambhaji Maharaj) नाव घेतो आणि पाठीत वार करतो? बरं ठीक आहे. शिवसेना (Shivena), काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र आलो होतो. हो आलो होतो. पण आता सत्ता गेल्यानंतरही आम्ही एकत्र आहोत. उलट आता आम्ही अधिक घट्ट आहोत, असा इशारा त्यांनी भाजपला (BJP) दिला.

 

 

बिहारमध्ये आधी नीतीश कुमार (Nitish Kumar) आणि लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचं सरकार होतं. आता तेच सरकार पुन्हा स्थापन झालंय. चांगली चाललेली सरकारं फोडायची, हा किती भयानक प्रकार आहे. पण त्यावेळी नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं सरकार पाडून तुम्ही नितीशकुमार यांचं काय चाटत होतात?  हा माझा सवाल आहे. आता तुम्ही संगमांसोबत सत्तेत आहात. पण त्याच संगमांवर तुम्ही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. मग संगमांनी हिसका दाखवल्यानंतर आता तुम्ही संगमांचं काय चाटत आहात?, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

…म्हणून आम्ही वज्रमूठ केली
उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शहा यांच्यावर जोरदार घणाघात केला.
काँग्रेस सोबत गेल्यामुळं हिंदुत्व सोडलं म्हणता, मुफ्ती मोहम्मद (Mufti Mohammad) आणि
महबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) सोबत काश्मीरमध्ये सत्तेत बसला होता तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? असा सवाल ठाकरे यांनी केला.
तुम्ही म्हणाल तो देशप्रेमी, तुम्ही म्हणाल तो देशद्रोही अशी तुमची भूमिका असेल तर ती गाडण्यासाठी आम्ही वज्रमूठ केली आहे, असा  इशारा त्यांनी यावेळी दिला.

 

शिंदेंना बाप दुसऱ्याचा लागतो
आज माझ्याकडे काहीच नाही, संकटाच्या काळात कोण मदतीला येतं? आमच्या पक्षाचे चिन्ह चोरले,
पक्ष चोरला आणि आता माझे वडिलही चोरायला निघाले आहेत.
एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) बाप सुद्धा दुसऱ्याचा लागतो, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
तसेच, अकाली दल, शिवसेनेला भाजपनं वापरुन घेतलं, आता त्यांना आपल्याला सत्तेवरुन खाली खेचायचंय.
पण शिवसेनेचा जन्म भाजपची पालखी वाहायला झालेला नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितलं.

आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं हिंदुत्व नाही
आमचे विचार स्पष्ट आहेत, आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचं हिंदुत्व (Hindutva) नाही.
काश्मीरमध्ये अतिरेक्यांना टिपणाऱ्या औरंगजेबाला हालहाल करुन मारण्यात आले,
देशासाठी शहीद झालेला औरंगजेब देशासाठी शहीद झाला.
अश्फाक उल्लाह खान देशासाठी फाशीवर गेले. अने धर्मातील लोकांसाठी देशासाठी प्राण अर्पण केले.
जे काम मी घरी बसून गेलं ते तुम्ही सुरत, गुवाहाटीला फिरूनही करु शकणार नाही.
तुम्ही मोदींना सोबत घ्या, मी माझ्या वडिलांच्या नावानं मैदानात येतो, असं थेट आव्हानही त्यांनी शिंदे गटाला दिलं.

 

Web Title :- Uddhav Thackeray | Uddhav Thackeray’s question to Amit Shah, ‘You say Congress licked the palms of the nationalists, what did you lick of Mindhen and Nitishkumar?’

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MVA Vajramuth Sabha | ‘मविआ’च्या सभेला ‘हा’ बडा नेता राहणार गैरहजर, कारणही आलं समोर

Subhash Desai | मुलाच्या शिंदे गटातील प्रवेशावर सुभाष देसाईंची प्रतिक्रिया, म्हणाले-‘त्याचं राजकीय अस्तित्व…’

CM Eknath Shinde | ‘…त्यांना जागा दाखवण्यासाठी ‘सावरकर गौरव यात्रा’ काढली’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राहुल गांधींना टोला (व्हिडिओ)