Uddhav Thackeray | एकत्र लढू, पण सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना इशारा (व्हिडिओ)

मालेगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेना (Shivsena) पक्ष आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला मिळाल्यापासून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मैदानात उतरले आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यापूर्वी रत्नागिरीतील खेडमध्ये जाहीर सभा घेतली होती. त्यानंतर रविवारी उत्तर महाराष्ट्रातील मालेगावात सभा घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकार (Central Government), निवडणूक आयोग (Election Commission), शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) वर जोरदार हल्लाबोल केला.

 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?
मलाच कळत नाही आजच्या या सभेचं वर्णन कसं करायचं? पंधरा दिवसांपूर्वी खेडला अतिविराट सभा होती. अभूतपूर्व असं दर्शन होतं. आजची सभा अथांग पसरलेली आहे. संजय राऊत तुम्ही जे बोललात ते बरोबर आहे. आज आपलं नाव, धनुष्यबाण चोरलेलं आहे. माझ्या हातात काही नाही तरी देखील एवढी गर्दी झाली ही सगळी पूर्वजांची पुण्याई आहे. मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी उद्वय आपण शपथ घेतली. पण मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाही तर तुमच्या प्रश्नांसाठी लढायचं. आता एकच जिंकेपर्य़ंत लढायचं, असं नारा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मालेगावच्या सभेतून शिवसैनिकांसाठी दिला.

गद्दारांना, ढेकणांसाठी तोफेची गरज नाही
गद्दार, ढेकणांना चिरडायला तोफ कशाला हवी? असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर (Shinde Group) निशाणा साधला. आज मी बारा वर्षानंतर मालेगावमध्ये आलो आहे. मालेगावकरांना मी धन्यवाद देतो. कोरोना (Corona) संकटात दोन ठिकाणी काळजाचा ठोका चुकला, मुंबई आणि मालेगाव. करायचं काय, बंदोबस्ताला आलेले पोलिसही कोरोनाग्रस्त होत होते. मी सर्व धर्मगुरुंशी बोललो आणि तुम्ही तेव्हा सहकार्य केलं नसतं तर मालेगाव वाचलं नसतं. मी घरात बसून सांगितलं ते तुम्ही ऐकलं त्यासाठी धन्यवाद मानतो. तुम्ही मला कुटुंबातील एक माणूस मानलं. हे गद्दारांच्या नशिबात असेल मला वाटत नाही, असे म्हणत शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

 

एक कांदा 50 खोक्याला जात असेल तर…
आज मी दोन शेतकऱ्यांना भेटलो रतन काका आणि कृष्णा भागवत तुम्ही म्हणता कांद्याला भाव मिळाला नाही, पण मी म्हणतो कांदा खरेदी झाली, गेल्या वर्षी एका कांद्याची खरेदी नाही का झाली. किती खोक्याला एक कांदा गेला, एक कांदा 50 खोक्याला जात असेल तर तुम्हाला किती खोके, रक्ताच्या आणि घामाचा पैसा मिळाला पाहिजे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

 

शेतकऱ्यांना हक्काचा हमी भाव मिळायला हवा
महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात दोन लाखापर्यंत कर्ज होतं त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला. सत्ता आल्यानंतर शेतकरी राजाला कर्जमुक्त करायचे हे पहिले पाऊल होते. मात्र गद्दारी झाली आणि सरकार गेलं. आपल्या सरकारला पाच वर्ष होणार होती. त्या दरम्यान टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा विचार मी करत होतो. पण दुर्दैवाने सरकार गेलं. शेतकऱ्यांना केवळ हमीभाव नाही तर हक्काचा भाव मिळाला पाहिजे. मला उत्तर म्हणून इथे सभा घेणार आहात ना त्याआधी शेतकऱ्यांना उत्तर द्या, असा टोला उद्धव ठाकरे यांनी दादा भुसे (Dada Bhuse) यांना लगावला.

मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने शेतात जातात
कृष्णा डोंगरे यांनी रक्ताने लिहिलं पत्र आहे. त्यामध्ये त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री महोदय तुम्ही शेतकऱ्यांचे पुत्र आहात. केंद्र सरकारचं (Central Government) धोरण हे शेतकरी विरोधी आहे. त्याच्या विरोधात पेटून उठा. पण बकरी कधी विरोध करणार? मुख्यमंत्री शेतकरी आहेत. दिवाळी ते  शेतात गेले होते. मुख्यमंत्र्यांच्या शेतात दोन दोन हेलिपॅड आहेत. हेलिकॉप्टरने शेतात गेले. मुख्यमंत्री स्वत:च्या शेतात रमतात, मात्र या शेतकऱ्यांच्या बांधावर यायला त्यांना वेळ नाही, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर केली.

 

कृषी मंत्र्यांना दिव्यदृष्टी
कृषी मंत्र्यांना दिव्यदृष्टी प्राप्त झाली आहे. ते काळोखात जाऊन अवकाळीची पाहणी करत आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान कृषीमंत्री काळोखात करतात. महिलांना शिव्या देतात… सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांना त्यांनी शिवीगाळ केली. तरीही मंत्री म्हणून निर्लजासारखे मांडीला मांडी लावून बसलात… हे त्यांचे हिंदुत्व आहे, असे ठाकरे म्हणाले.

 

निवडणूक आयोग गांडूळ झालेय
निवडणूक आयोगावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोग गांडुळ झालेय. आयोगाच्या डोळ्यात मोती बिंदू झाला नसेल तर खेड आणि मालेगावची सभा बघावी. प्रतिज्ञापत्र लाखोंच्या संख्येने दिली ती काय रद्दी होती काय. शिवसेना माझ्या वडिलांनी स्थापन केली. मिंधेंच्या वडिलांनी केली नाही. गद्दारांना स्वत:च्या वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते… गद्दारांच्या हातामध्ये भगवा शोभत नाही. पक्ष चोरला, चिन्ह चोरले मात्र यांना शिवसैनिक चोरता आला नाही. पण गद्दाराचा शिक्ता शिक्का कपाळावर मारु घेतला, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर हे आमचे दैवत
राहुल गांधी यांची शनिवारी पत्रकार परिषद चांगली झाली. त्यांनी त्यात चांगले मुद्दे उपस्थित केले होते.
मात्र, त्यांनी सावरकर यांचा अपमान करु नये. स्वातंत्र्यवीर सावरकर (Savantrya Veer Savarkar) हे आणचे दैवत आहे.
आम्ही दैवताचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना दिला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे केले ते येड्या गबाळ्याचे काम नाही. सावरकरांनी 14 वर्ष छळ सोसला.
जसे आपले क्रांतीकारक बळी गेले, तशाच मरम यातना सावरकर 14 वर्ष सोसत आहेत.
आपण लोकशाही टिकविण्यासाठी एकत्र लढत आहोत. त्याला फाटे फोडू नका असे आवाहन त्यांनी केले.
तसेच आम्ही सावरकर भक्त आहोत. भाजपमध्ये (BJP) काही सावरकर भक्त आहेत तरी काही अंध भक्त झालेत,
असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

 

तुमचा नेता म्हणजे भारत नाही
तुमचा नेता म्हणजे भारत नाही, मोदी म्हणजे भारत नव्हे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला.
मोदी म्हणजे भारत, तुम्हाला मान्य आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
यांच्यासाठी स्वातंत्र्यवीरांनी बलिदान दिले होते का? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
भाजप म्हणजे भ्रष्ट झालेला पक्ष असल्याची टीका त्यांनी केली. कोणाच्या मुलांच्या पत्नीवर आरोप करतात.
मात्र यांच्या नेत्यावर कुटुंबियांवर आरोप केल्यावर परराज्यात जाऊन अटक करतात.
आम्ही तुमच्या घरापर्यंत जातनाही कारण आमचे हिंदुत्व आहे. तुम्ही विरोधकांच्या घरात जाता.
गरोदर महिला, सहा वर्षाच्या मुलीची चौकशी करता, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

 

 

Web Title :- Uddhav Thackeray | Will fight together, but will not tolerate Savarkar’s insult, Uddhav Thackeray’s warning to Rahul Gandhi (Video)

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Sanjay Shirsat | अंबादास दानवे शिवसेनेत प्रवेश करणार?, संजय शिरसाट यांचा मोठा गौप्यस्फोट

Bachchu Kadu | ‘राष्ट्रवादीची बॅनरबाजी एकप्रकारची मुर्खता’, बच्चू कडूंनी राष्ट्रवादीला सांगितला नियम

Bharati Vidyapeeth New Law College Pune | मानवी हक्कासंबंधी ‘न्या.पी.एन.भगवती आंतरराष्ट्रीय मूट कोर्ट कॉम्पिटिशन’ला चांगला प्रतिसाद