मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मेव्हणीच्या कारला भीषण अपघात, एकाचा मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – शिर्डी योथून साईबाबाचे दर्शन करून परतताना झालेल्या अपघातात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेव्हणी अमृता श्रृंगारपुरे जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये एक नातेवाईकाचा मृत्यू झाला आहे.चालकाला डुलकी लागल्याने वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पांगरी गावाजवळ कार एका लहान पुलावरून खाली कोसळली.

यामध्ये तीन प्रवासी जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. घटनास्थळी सिन्नर ग्रामीण पोलीस दाखल झाले असून जखमींना तातडीने नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अमृता यांची प्रकृती चिंताजनक नसल्याचे वैद्यकीय सुत्रांकडून सांगण्यात येत आहे, असे पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सांगितले.

या अपघातामध्ये अमृता यांचे नातेवाईक अजय विश्वनाथ कारंडे यांचा मृत्यू झाला आहे. तर मनिषा मिश्रा आणि अमृता या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/