ड्रायव्हर, मेड अथवा भाडेकरू ‘संशयित’ तर नाहीत ? ‘या’ पध्दतीनं तुम्ही स्वतः तपासू शकता, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नेहमी असे आढळून आले आहे की, लोक कोणतेही ठोस व्हेरिफिकेशन न करता ड्रायव्हर, कामवाली किंवा भाडेकरू ठेवतात. याचा फायदा घेऊन अनेकदा संशयितसुद्धा तुमच्या घरात शिरतात. यासाठी कुणालाही कामावर किंवा भाडेतत्वावर ठेवण्यापूर्वी त्याचे व्हेरिफिकेशन जरूरी आहे. व्यक्तीचे ठोस व्हेरिफिकेशन आधार कार्डद्वारे केले जाऊ शकते. हे काम तुम्ही स्वत: काही मिनिटात करू शकता. आधारशी संबंधित सेवा देणारी अथॉरिटी युआयडीएआय तुम्हाला ही सुविधा देत आहे. आज आम्ही तुम्हाला याबाबत पूर्ण प्रक्रिया सांगणार आहोत…

अशी संपूर्ण प्रक्रिया
1 ज्या व्यक्तीला भाडेकरू, कामवाली, वर्कर किंवा ड्रायव्हर ठेवायचे आहे त्याचे आधार कार्ड व्हेरिफाय करू शकता. याद्वारे तुम्हाला हे समजू शकते की, आधारकार्ड नंबर खरा किंवा खोटा…

2 तत्पूर्वी पहिल्या स्टेपमध्ये तुम्हाला www.uidai.gov.in या वेबसाइटवर जावे लागेल.

3 यांनतर ‘माय आधार ’ सेगमेंटच्या ‘आधार सर्व्हिसेस’ सेक्शनमध्ये ‘व्हेरिफाय आधार नंबर’वर क्लिक करावे लागेल.

4 यानंतर तुमच्या समोर नवे पेज ओपन होईल. या पेजवर आधार नंबर आणि तेथे असलेला सिक्युरिटी कोड टाकून ‘व्हेरिफाय’वर क्लिक करावे लागेल.

5 यानंतर तुम्हाला आधार कार्डबाबत माहिती मिळेल.

तुम्हाला समजेल की, आधार कार्ड अ‍ॅक्टिवेट आहे किंवा नाही. या सोबतच व्हेरिफकेशन पूर्ण झाल्याचा मॅसेजसुद्धा दिसू लागेल.