उजणी धरण 86 % भरले

इंदापूर : पूणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांची जिवनदायीनी ठरलेले भीमा नदी तीरावरील उजणी धरणामध्ये दौंड येथुन ११ हजार ०८० क्युसेसने पाण्याचा विसर्ग होत असल्याने रविवारी २५ आगष्ट रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत उजणी धरण हे ८६.५२ टक्के भरले असुन,भीमा खोर्‍यातील धरण क्षेत्रातुन पाण्याचा उजणीत येणारा विसर्ग असाच वेगात सुरू राहीला तर उजणी धरण हे आठवडाभरात पूर्ण क्षमतेने भरणार असल्याची माहीती उजणीधरण व्यवस्थापन कार्यकारी अभियंता प्रकाश गवळे यांनी दीली आहे.

उजणी धरण हे सोमवार दिनांक २५ आगष्ट २०२० रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत ४६.३५ टीएमसी म्हणजेच ८६.५२ टक्के भरले असुन धरणातील सध्याची पाणी पातळी ही ४९६.२०५ मीटर इतकी आहे.धरणात एकुण पाणीसाठा हा ११०.०१ टी.एम.सी. इतका पाणी साठा आहे.तर उपयुक्त पाणी साठा हा ८६.५२ टक्के इतका आहे.मागील वर्षी उजणी धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने सोलापूर जिल्हा व परिसराची जिवनदायीनी ठरलेले उजणी धरण २७ नोव्हेंबर २०१९ रोजी पूर्ण क्षमतेने भरून १२३. २८ टी.एम.सी.इतके पाणी धरणात साठपा होउन १११.२८ टक्के धरण भरले होते. धरणातील पाणी पातळी ही झपाट्याने वाढत असल्याने उजणी काठच्या शेतकर्‍यांमध्ये धरण क्षेत्रात बसविलेल्या पाणी उपसा करणार्‍या इलेक्ट्रीकल मोटारी पाणी पातळी हद्दीच्या बाहेर उचलुन नेण्याची लगबग सुरू आहे.

उजणी धरणातुन भीमा-सीना बोगदा, उजणीचा मुख्य कालवा (कॅनल), भीमा नदी यामध्ये पाणी विसर्ग बंद असल्याने उजणी धरणातील पाण्याची पातळी ही झपाट्याने वाढत असुन या वर्षी उजणी धरणाच्या पिण्यासाठीच्या पाण्यावर अवलंबुन असनार्‍या गावांना व शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाण्याची कसलीही कमतरता भासणार नसल्याने उजणीच्या पाण्यावर अवलंबुन असणारा शेतकरी व समाधान व्यक्त करत आहे.तर दर वर्षी उजणी धरणाच्या खालचा भाग व १० लाख लोकसंख्या असलेल्या सोलापूर शहरातील नागरिकांसह शेतकर्‍यांना पाण्यासाठी झगडावे लागत असते परंतु या वर्षी धरणात पाणीसाठा मुबलक होत असल्याने ऐन उन्हाळ्यात किंवा संपूर्ण सिझन संपून पुढील वर्षीचा पावसाळा सुरू होई पर्यंत पाण्याची कसलीही कमतरता भासणार नसल्याने चालु वर्षी सोलापूरकरांना ऐन उन्हाळ्यात धावपळ करावी लागणार नसल्याने नागरीकांतुन समाधान व्यक्त होत आहे.