कामाची गोष्ट ! आता घर बसल्या स्मार्टफोनद्वारे बनवा Ration Card, फक्त ‘या’ कागदपत्रांची आवश्यकता, जाणून घ्या

नवी दिल्ली : देशात वन नेशन वन कार्डची व्यवस्था लागू झाल्यानंतर लोकांसाठी रेशन कार्ड असणे खुपच आवश्यक झाले आहे. याचा वापर केवळ स्वस्त रेशन घेण्यासाठी होत नाही तर ओळखपत्र म्हणून सुद्धा ते उपयोगी पडते. ही योजना लागू झाल्यानंतर कोणत्याही राज्याचा व्यक्ती संपूर्ण देशात कुठेही स्वस्त रेशन घेऊ शकतो. व्यक्तीकडे रेशनकार्ड असणे हे पॅनकार्ड आणि आधारकार्ड एवढेच महत्वाचे आहे.

जर तुमच्याकडे सुद्धा रेशनकार्ड नाही तर घाबरण्याची गरज नाही. तुम्ही घरबसल्या आपल्या स्मार्टफोनद्वारे ऑनलाइन रेशन कार्डसाठी अ‍प्लाय करून ते बनवू शकता. यासाठी सर्व राज्यांनी आपल्या वेबसाईट बनवल्या आहेत. तुम्ही ज्या स्टेटमध्ये रहाता, तेथील वेबसाईटवर जा आणि रेशनकार्डसाठी अ‍प्लाय करा.

3 प्रकारचे असतात रेशन कार्ड

– गरीबी रेषेच्या वर (एपीएल)

– गरीबी रेषेच्या खाली (बीपीएल)

– अंत्योदय कुटुंबांसाठी.
अंत्योदय कॅटेगरीत अतिशय गरीब लोकांना ठेवले जाते. ही कॅटेगरी व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नावर ठरते. शिवाय, रेशनवर मिळणार्‍या वस्तूंचे प्रमाण वेगवेगळे असते. हे ग्रामीण आणि शहरी दोन्हीसाठी आहे.

पात्रता अटी.
1 रेशन कार्ड बनवण्यासाठी व्यक्ती भारताची नागरिक असेण अनिवार्य.

2 व्यक्तीकडे अन्य राज्याचे रेशन कार्ड नसावे.

3 ज्याच्या नावावर रेशनकार्ड बनत आहे त्याचे वय 18 पेक्षा जास्त असावे.

4 अठरा वर्षांच्यापेक्षा कमी वयाच्या मुलांची नावे आई-वडीलांच्या रेशनकार्डमध्ये असतात.

5 कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या नावावर रेशनकार्ड असते.

6 रेशन कार्डमध्ये ज्या सदस्यांना सहभागी करून घेतले जात आहे, त्यांचे कुटुंब प्रमुखाशी जवळचे नाते असणे आवश्यक आहे.

7 कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे तत्पूर्वी कोणत्याही रेशनकार्डात नाव असू नये.

असे करा अ‍ॅपलाय
1 रेशन कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम तुमच्या राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर जा.

2 यानंतर अ‍ॅपलाय ऑनलाइन फॉर रेशन कार्ड च्या लिंकवर क्लिक करा.

3 रेशन कार्ड बनवण्यासाठी आयडी प्रूफ म्हणून आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी देता येते..

4 रेशन कार्डसाठी अर्जाचे शुल्क 5 रुपयांपासून 45 रुपयांपर्यंत आहे. अर्ज भरल्यानंतर शुल्क जमा करा आणि अ‍ॅपलिकेशन सबमिट करा.

5 फील्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जर तुमचा अर्ज योग्य असेल तर तुमचे रेशन कार्ड तयार होईल.

या कागदपत्रांची आवश्यकता
आयडी प्रूफसाठी आधार कार्ड, वोटर आयडी, पासपोर्ट, सरकारी आय कार्ड, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स देता येईल. याशिवाय पॅन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, उत्पन्नाचा दाखला पत्त्याचा पुरावा म्हणून विज बिल, गॅस कनेक्शन बुक, टेलिफोन बिल, बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, रेंटल अ‍ॅग्रीमेंट सारखे डॉक्युमेंट सुद्धा लागतील.

अल्प शुल्काची तरतूद
रेशन कार्ड बनवण्यासाठी अर्जदाराला अतिशय अल्प फि भरावी लागते. दिल्लीत हे शुल्क 5 रुपये ते 45 रुपयांपर्यंत आहे. अ‍ॅप्लीकेशन सबमिट झाल्यानंतर फील्ड व्हेरिफिकेशनसाठी पाठवले जाते. अधिकारी फॉर्ममध्ये भरलेली माहिती तपासात. अर्ज केल्यानंतर 30 दिवसांच्या आत प्रक्रिया पूर्ण होते. सर्व डिटेल व्हेरिफाय झाल्यानंतर रेशन कार्ड बनवले जाते. जर एखादी डिटेल चुकीची असेल तर अर्जदारावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.