SBI नंतर आता ‘या’ सरकारी बँकेनं ‘कमी केले ‘होम-ऑटो-पर्सनल’ लोनचे व्याजदर, कमी होईल तुमचा EMI, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   एसबीआय नंतर आणखी एक सरकारी बँक युनियन बँक ऑफ इंडियाने एमसीएलआर (Marginal cost of Funds Lending Rate) दर कमी करण्याची घोषणा केली आहे. बँकेने सर्व कालावधीसाठी एमसीएलआर दर 0.20 टक्क्यांनी कमी केले आहेत. या निर्णयानंतर युनियन बँकेचे प्रमुख कर्ज दर 7.40 टक्क्यांवरून 7.20 टक्क्यांपर्यंत खाली आले आहेत. आता एमसीएलआरवर आधारित सर्व कर्जाची एमएमआय कमी होईल. दरम्यान एसबीआयने देखील कर्जाचे दर कमी केले आहेत. एसबीआयने अल्प मुदतीतील एमसीएलआर दर 10 जुलैपासून 0.05 टक्के ते 0.10 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी एसबीआयने जूनमध्ये व्याजदरात 0.25 टक्क्यांनी कपात केली होती. 22 मे रोजी आरबीआयने रेपो दर 0.40 टक्क्यांनी कमी करून 4 टक्क्यांवर आणला होता. यानंतर पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ इंडिया आणि युको बँक यांनी रेपो आणि एमसीएलआरशी संबंधित त्यांचे कर्जे दर आधीच कमी केले आहेत.

एमसीएलआर म्हणजे काय?

एमसीएलआर म्हणजेच फंडांची किरकोळ किंमत कर्ज दर होय. हा तो दर आहे ज्याच्या खाली बँक कर्ज देऊ शकत नाही. अर्थात हे कमी झाल्यामुळे आता बँक कमी दराने कर्ज देऊ शकेल, जेणेकरुन गृह कर्ज ते वाहन कर्जापर्यंत सर्व काही आपल्यासाठी स्वस्त होईल. परंतु नवीन ग्राहकांना तसेच एप्रिल 2016 नंतर कर्ज घेतलेल्या ग्राहकांनाच हा लाभ उपलब्ध होईल कारण त्यापूर्वी कर्ज देण्यास निश्चित करण्यात आलेले किमान दर बेस रेट म्हटले जायचे. म्हणजेच बँका यापेक्षा कमी दराने कर्ज देऊ शकत नव्हत्या.

युनियन बँकेने जूनमध्येही व्याज दर कमी केले होते

युनियन बँक ऑफ इंडियाने जूनमध्ये सर्व ग्राहकांना दिले जाणारे कर्ज दर कमी करण्याची घोषणा केली होती. युनियन बँक ऑफ इंडियाने त्या काळात मुख्य व्याज दर एमसीएलआरमध्ये 0.10 टक्क्यांनी कपात केली होती. त्यावेळी युनियन बँक ऑफ इंडियाने एक वर्षाच्या कर्जावर आपला एमसीएलआर 7.70 टक्क्यांवरून 7.60 टक्क्यांवर आणला होता.