Union Minister Amit Shah | ‘शिवसेनेसोबत जुनी मैत्री होती म्हणून…’, अमित शहांचं उद्धव ठाकरेंबद्दल मोठं विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रात आम्ही आणि शिवसेना (Shivsena) एकत्र निवडणूक लढलो. फडणवीस यांच्या नेतृत्वात निवडणूक लढलो. जर भाजप (BJP) एकटी लढली असती तर पूर्ण बहूमत मिळालं असतं. मात्र शिवसेनेसोबत जुनी मैत्री होती, म्हणून त्यांच्यासोबत युती केली, असं विधान केंद्रीय मंत्री अमित शाह (Union Minister Amit Shah) यांनी केले आहे. एका वृत्तवाहीनीच्या कार्यक्रमात बोलत असताना अमित शाह (Union Minister Amit Shah) यांनी राजकीय घडामोडींवर परखड भाष्य केलं.

 

महाराष्ट्रात आम्ही आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढलो. देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) नेतृत्वात निवडणूक लढलो. यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री बनले, मात्र जनतेत गेले तेव्हा त्यांच्यातील वैचारिक मतभेद दिसू लागले. आमदार पळाले ते आमच्यामुळे नाही तर जनतेच्या दबावामुळे पळाले. खरी शिवसेना आमच्यासोबत एकत्र आली आहे. आगामी निवडणूक एकत्र लढवू आणि जिंकूही. आगामी निवडणुकीत शिवसेनेसोबत जागावाटप चर्चा अजून झालेली नाही, मात्र आम्ही एकत्र निवडणूक लढवणार आहोत, असं अमित शाह (Union Minister Amit Shah) यांनी सांगितलं.

 

अमित शाह पुढे म्हणाले, सगळे कुठे एकत्र आले. मोदींचा विरोध करण्यासाठी सगळे एकत्र येत आहेत. पण पश्चिम बंगालमध्ये काय करणार? दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) जागा सोडणार का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

कर्नाटकात निवडणूक (Karnataka Elections) जाहीर झाली आहे. बोम्मई पुन्हा मुख्यमंत्री होणार का असा प्रश्न अमित शाह यांना विचारला. यावर शाह म्हणाले, ते पार्टी ठरवेल. कर्नाटकच्या जनतेला डबल इंजिन सरकार हवं आहे. मोदींच्या योजनेला कर्नाटकात इम्प्लिमेंट करण्यासाठी तिकडे भाजप सरकारची गरज आहे. कर्नाटकात भाजप पूर्ण बहुमातात येणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Advt.

Web Title :- Union Minister Amit Shah ‘Because of old friendship with Shiv Sena…’, Amit Shah’s big statement about Uddhav Thackeray

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime News | ससून हॉस्पीटलच्या इमारतीवरून उडी मारून वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या युवतीची आत्महत्या

Shivchatrapati Sports Award | ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार’साठी ३१ मार्चपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

MP Girish Bapat | 3 टर्म नगरसेवक अन् 5 टर्म आमदार, भाजपसाठी ‘किंगमेकर’ असलेल्या गिरीश बापटांचा राजकीय प्रवास