Union Minister Narayan Rane | केंद्रीय मंत्री नारायण राणे लिलावती रुग्णालयात अ‍ॅडमिट; प्रकृती स्थिर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Union Minister Narayan Rane | भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital, Mumbai) दाखल करण्यात आले आहे. आज (शुक्रवारी) नारायण राणे हे रुटीन चेकअपसाठी लीलावती रुग्णालयात पोहोचले होते. त्यावेळी तपासणी केल्यानंतर राणे यांना रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यात आले असल्याची माहिती आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

 

नारायण राणे यांच्यावर अ‍ॅन्जिओप्लास्टी (Angioplasty) करण्यात आली आहे. अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. दरम्यान, शुक्रवारी आणि शनिवारी या दोन दिवस राणे यांना रुग्णालयामध्ये ठेवण्यात येईल आणि त्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. नारायण राणेंना दोन दिवस आराम करण्याचा सल्ला डाॅक्टरांनी दिला असल्याची माहिती आहे.

 

Web Title :- union minister and bjp leader narayan rane admitted in lilavati hospital mumbai

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा