‘निनावी’ पत्रामुळे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड ‘खळबळ’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – एका निनावी पत्रामुळे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे. निनावी पत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेह हा केवळ मराठ्यांचा पक्ष झाला असल्याची तक्रार करण्यात आली आहे. हे पत्र पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांना पाठवण्यात आले आहे. पुणे शहर अध्यक्षांसह ७ विधानसभा अध्यक्ष मराठा समाजाचे आहेत. अजित पवार यांच्याकडून इतर समाजातील कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याची भावना निनावी पत्र पाठवणाऱ्या कार्यकर्त्याने केली आहे. तसेच वंदना चव्हाण यांच्यामुळे पक्षाचे वाटोळे झाल्याचे पत्रात म्हटले आहे.

पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्याने आपल्या मनातील खदखद आणि पक्ष संघटना तसेच नेत्यांच्या तक्रारीचा पाढा या पत्रातून वाचला आहे. दोन पानी पत्रामध्ये पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या नेमकं काय चाललं आहे याची माहिती लिहण्यात आली आहे. या पत्राच्या प्रती पुणे शहर राष्ट्रवादीचे पदाधिकारी, पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठवण्यात आल्या आहेत. या लेटर बॉम्बमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

अजित पवारांनी जात पाहून केल्या नियुक्त्या
विधानसभा अध्यक्षांसह बहुतेक आघाड्यावर मराठा समाजाचे प्रमुख आहेत. अजित पवार यांनी जात पाहून नियुक्त्या केल्याचा आरोप पत्रात करण्यात आला आहे. पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करताना सर्वांना विचारात घेणे गरजेचे आहे. मात्र नियुक्त्या करताना कोणालाही विचारात घेण्यात आले नाही. तसेच माजी अध्यक्ष वंदना चव्हाण यांच्या काळामध्ये पक्षाचे वाटोळे झाले. तर सध्याचे अध्यक्ष पार्टटाईम असल्याचे सांगून पक्ष संघटनेत काहीच अलबेल नसल्याचे म्हटले आहे. परिस्थिती सुधारा अन्यथा पक्ष कोमात जाईल अशी चिंता देखील पत्राद्वारे व्यक्त करण्यात आलेली आहे.

मात्र पत्रात केलेल्या तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचं सांगत हे विरोधकांनी रचलेलं कारस्थान असल्याचा आरोप पक्षातर्फे करण्यात आला आहे. तर भाजपाने हे आरोप फेटाळले आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थितीचं राष्ट्रवादीकडून राजकारण सुरु आहे. त्यापेक्षा त्यांनी या पत्रावर चिंतन करावं असा सल्ला भाजपनं दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –