उन्नाव रेप केस : घात की अपघात, केंद्राने दिले CBI तपासचे आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या गाडीला झालेल्या अपघाताची चौकशी सीबीआयला सोपविण्यात आली आहे. केंद्र सरकारने या प्रकरणी सीबीआयला जबाबदारी दिली असून रायबरेलीमध्ये झालेल्या गाडीच्या अपघाताची चौकशी यापुढे सीबीआय करणार आहे. रायबरेलीमध्ये पीडितेच्या गाडीच्या आणि ट्रकच्या  अपघातात तिच्या मावशीचा आणि काकूचा मृत्यू झाला होता. तर पीडित या अपघातात गंभीर जखमी झाली आहे.

सध्या पीडितेवर लखनऊ मधील एका हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून तिची स्थिती गंभीर आहे. रविवारी दुपारी पीडिता प्रवास करत असलेल्या कारला झालेल्या अपघातात पीडितेच्या मावशीचा आणि काकूचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर हा अपघात नसून खून केला असल्याचे आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी या आमदारावर केले होते.

गंभीर जखमी झालेली पीडित हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर असून तिची स्थिती नाजूक असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर प्रदेश सरकारने  देखील या घटनेची चौकशी सीबीआय मार्फत करण्याची विनंती केली होती. त्यानंतर त्या मुलीच्या काकाने देखील या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

काकाला मिळाला जामीन 

पीडितेच्या काकाला पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी  नखनऊ हायकोर्टाने १८ तासांचा पॅरोल दिला आहे. या १८ तासांदरम्यान त्यांच्याबरोबर पोलिसांचा कडक पहारा असेल.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय