जगातील ‘हे’ 5 रहस्य अद्यापही गुलदस्त्यातच, ज्यांना आजपर्यंत कोणी देखील उलगडू शकलं नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था- जमीनीपासून आकाशापर्यंत संपूर्ण ब्रह्मांड रहस्यांनी भरलेले आहे. अनेक वैज्ञानिक आले आणि गेले, परंतु या रहस्यांवरील पडदा अजूनही तसाच आहे. आज आम्ही तुम्हाला काही अशी रहस्य सांगणार आहोत, जी वर्षानुवर्षे एक न उलगडलेले कोडे बनून राहिली आहेत. या रहस्यांचा उलगडा आजपर्यंत कुणीही करू शकलेले नाही.

ताओस हम्म (गूंज)
न्यू मेक्सिकोचे एक लहान शहर आहे ताओस. या शहराच्या बाहेरच्या भागात डिझेल इंजिन सुरू असल्याचा आवाज एकू येतो. हा आवाज लोक स्पष्ट ऐकू शकतात, परंतु तो कुठून येतो याचा शोध घेता येत नाही. अनेक डिटेक्टिव्ह मशीन्स सुद्धा या आवाजाचा शोध घेऊ शकल्या नाहीत. हा रहस्यमय आवाज ताओस हम्म (गूंज) या नावाने ओळखला जातो.

क्रिप्टोस (व्हर्जिनिया)
व्हर्जिनियाच्या लांगले येथील सीआयए मुख्यालयाच्या बाहेर एक आकृती आहे, जी क्रिप्टोसच्या नावाने ओळखली जाते. यावर काही कोड लिहिलेले आहेत, त्यापैकी तीन कोड डिकोड करण्यात आले आहेत, परंतु चौथा कोड जगभरातील अनेक तीष्ण बुद्धीवालेसुद्धा डिकोड करू शकलेले नाहीत. ही आकृती अमेरिकन कलाकार जिम सनबॉर्न याने तयार केली होती. हा कोड अजूनही रहस्यच आहे.

वॉयनिक मॅनुस्क्रिप्ट (हस्तलिपी)
600 वर्षे जुन्या या पुस्तकाला जगातील सर्वात रहस्यमय मानले जाते. 240 पाने असलेले हे पुस्तक हाताने लिहिलेले आहे, परंतु काय लिहिले आहे, कोणत्या भाषेत लिहिले आहे, हे अद्याप कुणालाही समजलेले नाही. हे पुस्तक एक न उलगडलेले कोडे आहे. यास वॉयनिक मॅनुस्क्रिप्ट असे नाव देण्यात आले आहे.

रहस्यमय इलेक्ट्रिक प्लग
अमेरिकेत राहणार्‍या एका व्यक्तीला कुठूनतरी एक रहस्यमय दगड मिळाला. या दगडात इलेक्ट्रिक प्लगसारखी आकृती आहे. आश्चर्य म्हणजे वैज्ञानिकांनी जेव्हा या दगडाची तपासणी केली तेव्हा तो लाखो वर्ष जुना असल्याचे आढळून आले. यानंतर वैज्ञानिकांनी त्या जागेविषयी विचारले जेथे हा रहस्यमय दगड मिळाला, परंतु त्या व्यक्तीने त्या जागेविषयी सांगण्यास नकार दिला.

रहस्यमय स्क्रू
रशियाच्या मॉस्को शहरातील एका भागात खोदकामात वैज्ञानिकांना एक विचित्र दगड मिळाला. या दगडाच्या आत स्क्रू सारखी दिसणारी वस्तू अडकलेली होती. जेव्हा हा दगड परिक्षणासाठी पाठवण्यात आला तेव्हा त्याचा अहवाल पाहून वैज्ञानिक सुद्धा आश्चर्यचकीत झाले. कारण त्या दगडात अडकलेला स्क्रू 30 करोड वर्ष जुना होता, जो डायनासोरच्या काळातील आहे. हा शोध आजही वैज्ञानिकांसाठी एखाद्या रहस्यापेक्षा कमी नाही. हा विचित्र दगड 1998 मध्ये सापडला होता.