Unwanted Hair in Women | महिलांच्या शरीरावर नको असलेले केस का वाढतात? जाणून घ्या कारण आणि उपचार

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Unwanted Hair in Women | काही महिलांच्या चेहर्‍यावर किंवा शरीरावर खुप जास्त केस येऊ लागतात. या नको असलेल्या केसाच्या (Unwanted Hair in Women) स्थितीला हर्सुटिज्म (Hirsutism) म्हटले जाते. महिलांचा चेहरा आणि शरीरावर हलक्या रंगाचे केस असतात परंतु हर्सुटिज्ममध्ये हे केस जाडे आणि काळ्या रंगाचे असतात. हे केस चेहरा, हात, पाठ किंवा छातीवर सुद्धा येऊ शकतात. महिलांमध्ये होणारे हर्सुटिज्म सामान्यपणे पुरुष हार्मोनशी संबंधीत असते. हर्सुटिज्म हानिकारक नाही.

 

हर्सुटिज्मची कारणे (Hirsutism Causes) –
टेस्टोस्टेरोनसह एण्ड्रोजन हार्मोनचा स्तर सामन्यापेक्षा वाढल्यास महिलांच्या शरीरावर नको असलेले केस येतात. या कारणामुळे महिलांमध्ये पुरुषांप्रमाणे केस उगवू लागतात. याची अनेक कारणे आहेत, परंतु सर्वात सामान्य कारण पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (PCOS) आहे.

 

याचा परिणाम हार्मोन प्रॉडक्शन आणि पीरियड्स आणि फर्टिलिटीवर सुद्धा होतो. याशिवाय एड्रेनल ग्लँड डिसऑर्डर (Adrenal gland disorders) मुळे सुद्धा महिलांच्या शरीरावर वेगाने नको असलेले केस उगवू लागतात.

 

हर्सुटिज्मची लक्षणे (Hirsutism Symptoms) –
वजन वेगाने वाढू लागते, मुरूमे, खुप जास्त थकवा, मूडमध्ये बदल, पेल्विक पेन, डोकेदुखी, इनफर्टिलिटी, झोपेची समस्या ही हर्सुटिज्मची सामान्य लक्षणे आहेत. (Unwanted Hair in Women)

 

काही प्रकरणात ब्लड प्रेशर वाढणे, हाडे आणि मांसपेशी कमजोर होण्यासारखी लक्षणे सुद्धा दिसतात. याचे निदान करण्यासाठी डॉक्टर्स हार्मोन लेव्हल तपासण्यासाठी ब्लड टेस्ट करतात. ट्यूमर आणि सिस्टचा शोध घेण्यासाठी अल्ट्रासाउंड सुद्धा करतात.

 

नको असलेल्या केसांचा उपचार (Treatment for excessive or unwanted hair)-

 

जर वजन खुप जास्त असेल तर डॉक्टर तुम्हाला वजन कमी करण्यास सांगू शकतात.

वजन योग्य राखल्यास हार्मोनचा स्तर नियंत्रित राहतो.

PCOS किंवा एड्रेनल डिसऑर्डर असल्यास डॉक्टर औषध सुरू करू शकतात.

हर्सुटिज्म कंट्रोल करण्यासाठी कधी-कधी डॉक्टर गर्भनिरोधक गोळ्यासुद्धा देतात. जेणेकरून हार्मोन योग्य राखले जावे.

याशिवाय हेयर रिमूव्हल, व्हॅक्सिंग, शेविंग, डिपीलेटरी लेझर हेयर रिमूव्हल आणि इलेक्ट्रोलिसिसद्वारे सुद्धा नको असलेल्या केसांपासून मुक्ती मिळू शकते.

 

Web Title :- Unwanted hair in women causes symptoms treatment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | अंगावरील हळदीचा ‘कलर’ जाण्यापूर्वीच नवरीने दाखवला तिच्या नखऱ्याचा ‘रंग’, दोनच दिवसात केलं ‘हे’ भयानक कृत्य; जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | चरस तस्करीच्या गुन्ह्यातील आरोपीचे गोव्यातील हॉटेलमधून बेड्यांसह पलायन; पुणे ग्रामीण पोलिसांची शोध मोहीम सुरू

Mukesh Ambani’s RIL | मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने केला ‘विक्रम’, यावर्षी गुंतवणुकदारांना दिला 37 % फायदा; जाणून घ्या