UP ATS Action | 15 ऑगस्टला करायचा होता मोठा ‘धमाका’, दहशतवादी घडवणार होते संपूर्ण युपीत बॉम्बस्फोट

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊच्या दुबग्गा रिंग रोडवरील सिते बिहार भागात अल कायदाच्या दोन दहशतवाद्यांना (terrorists) अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि शस्त्रास्त्र जप्त करण्यात आली आहे. यूपी एटीएसच्या कारवाईबाबत (UP ATS Action) राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार (Prashant Kumar) यांनी माहिती दिली. यूपी एटीएसने केलेल्या कारवाईत (UP ATS Action) दहशतवाद्यांच्या मोठ्या मॉड्यूलचा (big terror module) पर्दाफाश झाला आहे. त्यांच्याकडून स्फोटकं आणि शस्त्रास्त्र जप्त केली आहेत. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाला घातपात घडवून यूपी हादरवण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती प्रशांत कुमार यांनी दिली.

दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध
अटक करण्यात आलेले दहशतवादी हे अल कायदाच्या अन्सार गझावत उल हिंदचे आहेत. लखनऊमध्ये अनेक ठिकाणी स्फोट घडवण्याचा त्यांचा कट होता. एवढंच नाही तर उत्तर प्रदेशातील इतर अनेक शहरांमध्ये स्फोट घडवण्याचा त्यांचा कट होता. अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा संबंध पाकिस्तानशी (Pakistan) असल्याचे समोर आले असल्याची माहिती प्रशांत कुमार यांनी दिली.

साथिदारांचा शोध सुरु

मिनहाज अहमद, मसरुद्दीन अहमद असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. मिनहाज अहमद याच्या घरात स्फोटकं आढळून आली आहेत. दहशतवाद्यांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी सुरु आहे. त्यांच्या साथिदारांचा शोध सुरु आहे. दहशतवाद्यांचे काही साथीदार हे कानपुरमध्ये लपले असल्याची माहिती, प्रशांत कुमार यांनी दिली.

या भागात हाय अलर्ट घोषित
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांना अमर अल मंदी याने प्रशिक्षण दिले होते.
घरात हे दहशतवादी लपून बसून आपला कट रचत होते.
याबाबत एटीएसला एक आठवड्यापूर्वीच माहिती मिळाली होती.
त्यामुळे एक आठवड्यापासून एटीएसचे पथक या घरावर नजर ठेऊन होते.
2-3 संशयित व्यक्ती या घरात ये-जा करत होते.
आज छाप्यादरम्यान 6 ते 7 किलो स्फोटकं जप्त करण्यात आले आहेत.
या एटीएसच्या मोठ्या कारवाईदरम्यान रायबरेली, सीतामढी मध्ये हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

Web Title :- UP ATS Action | ats up has uncovered a big terror module arrested two terrorists linked with al qaedas ansar ghazwat ul hind says adg up

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Viral Video | लग्नात वधूला मिठाईच्या बॉक्समध्ये मिळाले असे गिफ्ट, पाहताच बदलला चेहर्‍याचा रंग, पहा मजेदार व्हिडीओ

Pune News | शेरेबाजी करण्यापेक्षा पाटील यांनी रखडलेले प्रकल्प मार्गी लावावेत – माजी आमदार मोहन जोशी

फायद्याची गोष्ट ! मुलांसाठी ‘या’ बँकेनं ने सुरू केली विशेष सुविधा, राहणार नाही भविष्याची चिंता; होईल मोठा फायदा

Nitesh Rane | व्यासपीठावरील शिवसेना नेत्यासमोर नितेश राणेंचे युतीबद्दल वक्तव्य