मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी ‘या’ 2 गोष्टींचा शिवसेनेला ‘त्याग’ करावा लागेल, मग ‘UPA’ला मान्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्तास्थापनेचा पेच सुटतासुटत नसताना शिवसेना मात्र मुख्यमंत्रीपदावर आडून बसली आहे. अशातच जर शिवसेनेला काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन करून शिवसेनेचा मुख्यमंत्री करायचा असेल तर शिवसेनेला दोन महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. शिवसेनेला पाठिंबा हवा असेल तर एनडीएतून बाहेर पडावं, केंद्रातील मंत्र्यांनी राजीनामे द्यावे आणि यूपीएत सहभागी व्हावं लागेल.

काँग्रेस-राष्ट्रवादीने घातलेल्या अटींमुळे शिवसेनेची मोठी अडचण झाली आहे. जर युपीएच्या अटी मान्य केल्या नाहीत तर शिवसेनेचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न तुर्तास तरी अपूर्ण राहण्याची शक्यता आहे. पडद्यामागून भाजपसोबत चर्चा सुरु ठेवायची आणि दुसरीकडे राष्ट्रवादी व काँग्रेससोबत बोलणी सुरु ठेऊन दोन्ही काँग्रेसचा पाठिंबा घेऊन राज्यात सत्ता स्थापन करण्याचा मनसुबा शिवसेनेचा आहे. मात्र, दोन्ही काँग्रेसने घातलेल्या अटीमुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे.

भाजपवर दबाव टाकून मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घ्यायचे यावर शिवसेना ठाम आहे. तर काहीही करून मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घ्यायचे असा आग्रह धरणाऱ्या शिवसेनेला दोन्ही काँग्रेससोबत जाणे नुकसानीचे होणार आहे. त्यामुळे केवळ मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाण्यापेक्षा भाजपवर दबाव टाकून महत्त्वाची खाती घेऊन आपला फायदा करुन घ्यायचा किंवा सन्मानाने रहायचे ते शिवसेनेने ठरवायचे आहे. मात्र, काँग्रेसचा एक गट शिवसेनेच्या बाजूने आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर शुक्रवारपर्यंत शिवसेनेला कोणती तरी एक भूमिका घ्यावी लागणार आहे.

Visit : Policenama.com

तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे सुद्धा होऊ शकतो ‘मायग्रेन’ चा त्रास
भेसळयुक्त ‘कुंकू’ वापरले तर होऊ शकतात ‘गंभीर’ परिणाम, जाणून घ्या
शरीरयष्टी किरकोळ असेल तर ‘हे’ 6 पदार्थ खा, दिसाल सेलिब्रिटींसारखे फिट
चेहऱ्याचे सौंदर्य खुलवण्यासाठी करा ‘हे’ 5 घरगुती आणि सोपे उपाय, जाणून घ्या
चुकीनही करू नका ‘यो यो डाएट’, बिघडू शकते तब्येत, जाणून घ्या
‘जंक फूड’ खाण्याची सवय सोडविण्यासाठी ‘हे’ 5 खास उपाय, जाणून घ्या
सावधान ! प्लॅस्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय ? जाणून घ्या धोके