पोलीसनामा ऑनलाईन टीम – छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आणि बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) स्पर्धक उर्फी (Urfi Javed) तिच्या बोल्ड फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते. उर्फी सोशल मीडियावर सध्या जास्तच सक्रिय पाहायला मिळते. हल्ली उर्फी (Urfi Javed) सार्वजनिक ठिकाणी जरा जास्तच विचित्र कपडे परिधान करून नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत असते.
उर्फी जावेद फॅशन सेन्सच्या बाबतील इतर अनेक दिग्गज अभिनेत्र्यांना मागं टाकते. तर अनेकदा उर्फी हॉलिवूडमधील अभिनेत्र्यांना कॉपी करताना दिसून येते. मात्र ती आता एका वेगळ्यांच गोष्टीमुळं चर्चेत आली आहे. नुकतीच ती मुंबई एअरपोर्टवर दिसली. नेहमीच एअरपोर्ट सारख्या ठिकाणी विचित्र कपडे घालणारी उर्फी, चक्क आता ट्रांन्सपरेंट नेटच्या टॉपमध्ये दिसली आहे. यावेळी तिनं खूपच बोल्ड कपडे घातले असून, (Urfi Javed Viral Photo) तिचे फोटो सोशल मीडियावर तीव्र प्रमाणात व्हायरल होताना बघायला मिळतायेत. या फोटोंमध्ये उर्फीनं पूर्णपणे पारदर्शक काळ्या रंगाचा टॉप आणि काळी पॅंन्ट परिधान केलेली दिसून येत आहे. केसांमध्ये पोनीटेल बांधली असून, डोळ्यात लेंस लावून नॅचरल मेकअप केला आहे.
–
दरम्यान, उर्फीचे एअरपोर्टवरील हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होताना दिसत असून, अनेक नेटकऱ्यांनी तिला फॅशन सेंन्समुळं ट्रोल केलं आहे.
Web Title :- Urfi Javed | bigg boss ott fame urfi javed spotted in transparent top at airport urfi javed marathi news policenama
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या 43 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी
Sania Mirza | सानिया मिर्झाच्या मुलाची तब्येत बिघडली, शोएब मलिक बांग्लादेश दौ-याहून रवाना