वादाच्या भोवऱ्यात सापडल्या उर्वशी रौतेलाच्या सोशल मीडिया ‘पोस्ट’, PM मोदींचं ट्विटही केलं होतं ‘Copy-Paste’ !

पोलीसनामा ऑनलाईन :अभिनेत्री उर्वशी रौतेला आपल्या फोटोंमुळं तर चर्चेत असतेच सोबत अनेकदा आपल्या पोस्टमुळंही ते चर्चेचा हिस्सा बनताना दिसत असते. अलीकडेट उर्वशी आपल्या एका पोस्टमुळं नको त्या कारणानं वादात सापडली होती. नुकताच OTT प्लॅटफॉर्म अॅमेझॉन प्राईमवर ऑस्कर विजेता सिनेमा पॅरासाईट रिलीज झाला. उर्वशीनं या सिनेमाशी संबंधित एक रिव्ह्यु ट्विटरवरून शेअर केला. अमेरिकेतील एका लेखकानं तिच्यावर चोरीचा आरोप केला आहे.

तसं पाहिलं तर उर्वशीवर चोरीचा आरोप होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2018 मध्ये सुपरमॉडेल गिगी हदीदची एक इंस्टा पोस्ट तिनं हुबेबूब कॉपी केली होती. यानंतर उर्वशी प्रचंड ट्रोल झाली होती. खरं तर ही पोस्ट सोशल मीडिया निगेटीविटीबद्दल होती. यावर गिगी हदीदनं कोणतीही प्रतिक्रिया नव्हती दिली.

PM मोदींचं ट्विटही उर्वशीनं केली होतं Copy Paste

जानेवारी 2020 मध्ये उर्वशीनं ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमींबद्दल एक ट्विट केलं होतं. त्यावेळी शबानांचा अपघात झाला होता. यानंतर अनेकांनी त्यांच्या आरोग्याबद्दल ट्विट केलं होतं. उर्वशीनंही ट्विट केलं होतं. परंतु तिनं हे ट्विट कॉपी पेस्ट केलं होतं. यात त्यांनी लवकरच ठिक व्हावं अशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती. हे ट्विट पीएम मोदींचं होतं जे कॉपी केल्यामुळं उर्वशी खूप ट्रोल झाली होती.

https://www.instagram.com/p/B-WLfergefW/

https://www.instagram.com/p/B-Tl8k_AObd/

https://www.instagram.com/p/B-Tl6q0g8_c/