‘कोरोना’तून बरे झाल्यानंतर ट्रम्प यांनी पुन्हा साधला चीनवर निशाणा, म्हणाले…

ADV

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था –   अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा एकदा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांनी पुन्हा एकदा चीनवर निशाणा साधला आहे. कोरोनाचा फैलाव केल्याबद्दल त्यांनी चीनवर टीकास्त्र सोडले आहे तसेच चीनने आपल्यासोबत जे केलं आहे ते कधीच विसरणार नाही असा पुनरूच्चार ट्रम्प यांनी केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, चीनसोबत जे सुरु आहे याचा कोणी कधी विचारही केला नव्हता. जोपर्यंत कोरोना आला नव्हता तोपर्यंत आपण त्यांच्यापेक्षा उत्तम कामगिरी करत होते. आपण कोरोनामधून बाहेर येत असून जवळपास 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची भीती होती. पण आपण योग्य निर्णय घेतल्याने ही संख्या दोन लाख आहे. आपण कोणाचाही मृत्यू होऊ द्यायला नको होतं. त्यांनी आपल्यासोबत जे केलं आहे ते विसरणार नाही.

ADV

ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान म्हटले की, कोरोनाचा प्रसार होण्याआधी अमेरिका सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती. यावेळी त्यांनी कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती कृत्रिम असल्याचा दावा केला आहे. आपण सर्व एकत्रित येत होते आणि यासाठी यश हा महत्त्वाचा मार्ग होता. जोपर्यंत ही कृत्रिम आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली नाही तोवर ते होतही होतं असं ट्रम्प यांनी म्हटले आहे.

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत असून रुग्णसंख्येने 80 लाखांचा टप्पा पार केला आहे. सध्या अमेरिकेत 80 लाख 8 हजार 402 कोरोना रुग्ण असून 2 लाख 18 हजार 97 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.