Coronavirus : ‘कोरोना’ लसीसंदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, म्हणाले…

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना व्हायरसची लस वर्षअखेरीस अमेरिकेकडे उपलब्ध होईल असा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी केला. ‘आम्हाला पूर्ण विश्वास आहे. वर्षअखेरीस आमच्याकडे कोरोना व्हायरसवर लस उपलब्ध असेल’ असे ट्रम्प यांनी सांगितले.

जगभरात कोरोनाची लस बनवण्यासाठी जगभरात मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरु आहे. अमेरिकेसह जगातील प्रमुख देशांमध्ये कोरोनाला रोखणारी पहिली लस बाजारात आणण्यासाठी स्पर्धा आहे. कोरोना व्हायरसविरोधातील लस निर्मितीमध्ये अन्य देशांनी अमेरिकन संशोधकांवर मात केली तर आपल्याला आनंदच होईल असे ट्रम्प म्हणाले.

‘मला बाकी काही माहित नाही, फक्त कोरोना व्हायरसला रोखणार लस हवी आहे’ असे ट्रम्प यांनी सांगितले.  अमेरिकेत सप्टेंबरमध्ये शाळा, कॉलेजेस, विद्यापीठे सुरु करण्याचे त्यांनी आवाहन केले. सध्या कोरोना व्हायरसमुळे शाळा, कॉलेजेस, विद्यापीठे बंद आहेत. लस निर्मितीच्या या प्रक्रियेमध्ये मानवी चाचण्या नेहमीपेक्षा वेगाने सुरु आहेत, त्यामध्ये असलेल्या धोक्यांबाबत विचारले असता, ‘स्वयंसेवकांना आपण काय करतोय ते माहित असते’ असे उत्तर ट्रम्प यांनी दिले.