‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर WHO चं सूचक विधान, म्हणाले – ‘जगातील मोठी लोकसंख्या धोक्यात’

जिनिव्हा : पोलीसनामा ऑनलाइन  –   जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालिन सेवांच्या प्रमुखांनी म्हटले की, जगभरात प्रत्येक दहापैकी एक व्यक्ती कोरोनाने संक्रमित होऊ शकते. कोविड-19 वर सोमवारी झालेल्या 34 सदस्यीय कार्यकारी बोर्डाच्या बैठकीत डॉ. मायकल रायन यांनी म्हटले की, शहरी आणि ग्रामीण परिसरातील संख्येत बदल होऊ शकतात, परंतु अखेरीस याचा अर्थ हाच आहे की, जगातील मोठी लोकसंख्या धोक्यात आहे. तज्ज्ञ अगोदरपासूनच सांगत आहेत की, संसर्गाची जेवढी संख्या सांगितली जात आहे, प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला आहे.

कोरोना व्हायरस संसर्गात मुलांची प्रमुख भूमिका : संशोधन

भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग प्रामुख्याने संक्रमित लोकांच्या एका छोट्या वर्गात पसरत आहे. या वर्गाला सुपर स्प्रेडरसुद्धा म्हटले जाते. देशात संक्रमितांच्या संपर्काचा शोध घेण्यार्‍या सर्वात मोठ्या संशोधनात हे समजले आहे. संशोधनात हे सुद्धा समोर आले की, नोवेल कोरोना व्हायरसच्या संसर्गात मुलांची एक प्रमुख भूमिका आहे.

कोविड-19 जागतिक महामारीसंबंधी आतापर्यंत सर्वात मोठ्या विश्लेषणात आढळले आहे की, विकसित देशांच्या तुलनेत भारतात 40 वर्ष ते 69 वर्षापर्यंतच्या वयोगटात कोरोना व्हायरसची जास्त प्रकरणे समोर आली आहेत. तसेच मृतांमध्ये सुद्धा याच वयोगटातील लोक जास्त आहेत.

हे विश्लेषण करणार्‍या संशोधकांमध्ये आंध्र प्रदेश आणि तमिळनाडु सरकारचे संशोधक सुद्धा सहभागी आहेत. यामध्ये आढळले आहे की, देशातील कोविड-19 च्या 70 टक्केपेक्षा जास्त रूग्णांनी आपल्या संपर्कात येणार्‍या कोणत्याही व्यक्तीला संक्रमित केले नाही, तर आठ टक्के संक्रमित व्यक्ती 60 टक्के नव्या संसर्गाला जबाबदार आहेत.