धावपट्टू हुसेन बोल्टला बर्थडे पार्टी भोवली !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – धावण्यात आठ वेळा ऑलम्पिक चॅम्पियन ठरलेल्या हुसेन बोल्टचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह आला आहे. मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, बोल्टने त्याचा कोरोना अहवाल पॉजिटिव्ह येण्याच्या पहिल्या दिवशी जमैकामध्ये त्याच्या 34व्या वाढदिवसाची पार्टी केली होती. त्या पार्टीमध्ये फुटबॉलपट्टू रहीम स्टर्लिंग देखील उपस्थित होता.

हुसेन बोल्टची काही दिवसांपूर्वी कोरोना चाचणी करण्यात आली आणि त्यात त्याचा अहवाल पॉजिटिव्ह आला. बोल्टने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. 21 ऑगस्टला झालेल्या पार्टीत सामाजिक अंतर पाळले गेले नव्हते.

रिपोर्ट येण्याआधी बोल्टने लिहिलं होतं की, ‘सोशल मीडियाच्या माहितीनुसार मी कोरोना पॉजिटिव्ह आहे, शनिवारी तपासणी केली, सध्या मी सगळ्यांपासून लांब राहत आहे.’

25 वर्षीय फुटबॉलपट्टू रहीम स्टर्लिंग प्रीमियर लीग क्लब मँचेस्टर सिटी आणि इंग्लंडच्या राष्ट्रीय टीममध्ये खेळतो. स्टर्लिंग ठीक असल्याची माहिती काही सूत्रांनी दिली आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणं त्याच्यात दिसत नसून तो ठीक आहे.

11 वर्ल्ड आणि 8 वेळा ऑलम्पिक गोल्ड मेडल विजेता बोल्टने 100 मीटर, 200 मीटर आणि 4×100 मीटर रिले मध्ये वर्ल्ड रेकॉर्ड बनवले आहेत. 2017 मधील ऑलम्पिक मध्ये त्याचं स्वप्न अपूर्ण राहील होतं.