भोपळाच नव्हे तर त्याची ‘साल’ देखील ‘गुणकारी’, त्वचेच्या ‘या’ समस्यांपासून मिळतो आराम, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : भोपळा बर्‍याच पौष्टिक पदार्थांनी समृद्ध असतो. हा केवळ आरोग्यासाठीच फायदेशीर ठरत नाही तर त्वचेसाठीही चांगला आहे. भोपळ्याचे ज्यूस पिल्याने वजन कमी होण्याबरोबरच त्वचेची चमक देखील वाढते. विशेष म्हणजे भोपळ्याची साल आपले सौंदर्य देखील वाढवते. भोपळ्याच्या सालीच्या वापराने आपली त्वचा काही दिवसांत चमकू लागेल. भोपळ्याच्या सालीपासून त्वचेला होणारे फायदे जाणून घेऊया.

टॅनिंगच्या समस्येवर करा मात

कडक उन्हामुळे त्वचेवर टॅनिंग होणे खूप सामान्य बाब आहे, परंतु याकडे दुर्लक्ष केल्याने त्वचेची समस्या वाढू शकते. सनबर्नच्या कारणामुळे त्वचा काळपट आणि निर्जीव दिसू लागते. आपण त्वचेवरील टॅनिंग काढून टाकण्यासाठी भोपळ्याचा वापर करू शकता. यासाठी भोपळ्याची साल मिक्सरमध्ये बारीक करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट आपल्या त्वचेवर किमान 15 मिनिटांसाठी लावा. यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा.

त्वचा बनवा टवटवीत

आपली निर्जीव त्वचा टवटवीत करण्यासाठी तुम्ही भोपळ्याची साल वापरू शकता. भोपळा फायबर आणि जीवनसत्वांनी भरपूर असतो जो त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो. चमकदार त्वचेसाठी आपण भोपळ्याची साल वापरू शकता. भोपळ्याच्या सालीने फेस-मास्क तयार करण्यासाठी प्रथम भोपळ्याची साल बारीक करून घ्या. त्यानंतर या पेस्टमध्ये चंदन पावडर घाला. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा ही पेस्ट लावल्यास तुमचा चेहरा काही दिवसात चमकदार होईल.

त्वचेवरील जळजळ होते कमी

कधीकधी सूर्यप्रकाश आणि धुळीमुळे चेहऱ्याच्या त्वचेवर जळजळ होते. अशा परिस्थितीत भोपळ्याची साल आपल्याला मदत करू शकते. यासाठी भोपळ्याची साल उन्हात चांगली कोरडी करा. यानंतर ही कोरडी झालेली साल चांगली बारीक करा. आता या पावडरमध्ये एक चमचा गुलाबपाणी मिसळून याची पेस्ट बनवा. आता हे तयार झालेले मिश्रण चेहर्‍यावर लावा. 15 मिनिटांनी आपला चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. भोपळा आणि गुलाबपाण्याचा हा पॅक लावल्याने काही दिवसात चेहऱ्यावरील होणारी जळजळ बरी होईल. याव्यतिरिक्त चेहऱ्यावरील डाग देखील काही दिवसात बरे होतात.