घृणास्पद ! 12 वर्षीय मुलाचं अपहरण करून जंगलात नेलं, साथीदारासह मिळून केले 3 दिवस अनैसर्गिक अत्याचार

मेरठ : वृत्तसंस्था – एका 12 वर्षीय मुलाचं अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील ही घटना आहे. पीडित मुलानं घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे.

एका 12 वर्षांच्या मुलाला शेजारच्या तरुणानं खाऊचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर अन्य एका साथीदाराच्या मदतीनं त्याला जंगलात नेल. तिथं 3 दिवस त्याच्यावर अनैर्गिक अत्याचार केले. गुरुवारी रात्री सदर मुलगा गंभीर अवस्थेत आढळून आला. त्यानं पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं.

एक व्यक्ती रिझानी गावात मजुरीचं काम करते. त्याच्या शेजारी रामतीर्थ नावाचा तरुण राहतो. रामतीर्थ यानं त्याच्या 12 वर्षीय मुलाला विडी ओढण्याची सवय लावली. याबाबत त्याच्या वडिलांना समजले. तो मुलावर रागवला. मात्र त्याची सवय गेली नाही. 24 ऑगस्ट रोजी हा मुलगा अचानक बेपत्ता झाला. 2 दिवस या मुलाचा शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. अखेर कुटुंबीयांनी परतापूर पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. तर शेजारी राहणाऱ्या रामतीर्थवर मुलाचे अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला होता. तक्रारीनंतर पोलिसांनी रामतीर्थला ताब्यात घेत कसून चौकशी केली. परंतु त्यानं काही सांगितलं नाही.

गुरुवारी रात्री या मुलाच्या शेजारी राहणारी व्यक्ती गावाजवळून जात होती त्यावेळी त्याला गंभीर अवस्थेत हा मुलगा दिसून आला. यानंतर पोलिसांना कळवण्यात आलं. यानंतर पोलिसांनी मुलाला ठाण्यात नेलं त्यानंतर त्यानं घडलेला सर्व प्रकार सांगितला.

मुलानं सांगितलं की, शेजारी राहणाऱ्या रामतीर्थनं सोबत नेलं. नंतर मला जंगलात नेऊन त्याच्या साथीदारासह 3 दिवस अत्याचार केले. मी विरोध केला असता मला बेदम मारहाण केली. मी कसाबसा पळून आलो.

यानंतर पोलिसांनी रामतीर्थासह साथीदाराला अटक केली. दोघांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.