मुलींच्या समोर पत्रकार विक्रम जोशी यांच्यावर हल्ला, गोळी झाडून केली हत्या, CCTV मध्ये कैद झाली घटना

नवी दिल्लीः वृत्तसंस्था – गाझियाबादच्या विजयनगर भागात पत्रकार विक्रम जोशी यांच्यावर काही अज्ञात बदमाशांनी हल्ला केला होता. आता त्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये विक्रम जोशी आपल्या दोन मुलींसोबत मोटरसायकलवरून जात होते. त्यानंतर अज्ञात बदमाशांनी त्यांना घेरले आणि गोळ्या घातल्या. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सुमारे 5 ते 6 बदमाशांनी प्रथम विक्रम जोशीला घेराव घातला आणि नंतर त्यांना मारहाण केली. नंतर विक्रम जोशी यांना गोळ्या घालून बदमाश फरार झाले. वडिलांना जखमी अवस्थेत पाहून मुलगी मदतीसाठी याचना करत राहिली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. आता पोलिस या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत. काही दिवसांपूर्वी विक्रम जोशी यांनी पोलिस स्टेशन विजय नगर येथे एक तक्रार दिली होती, ज्यात त्यांनी सांगितले होते की, काही मुले त्याच्या भाचीचा विनयभंग करतात. सोमवारी संध्याकाळी विक्रम जोशी कुठेतरी जात असतांना या बदमाश्यांनी येऊन त्याच्यावर हल्ला केला आणि गोळ्या झाडल्या.

विक्रम जोशी यांचे भाऊ अनिकेत जोशी यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी काही मुले त्याच्या भाचीचा विनयभंग करीत होते, त्याचा भाऊ विक्रम जोशी यांनी त्याला विरोध केला होता. विक्रम जोशी यांनी तक्रार पोलिस स्टेशनला दिली. यानंतर सोमवारी त्या लोकांनी माझ्या भावावर हल्ला केला. एसएसपी कलानिधी नैथानी म्हणाले होते की, विजय नगर येथे एका पत्रकारावर हल्ला झाला असून त्याच्यावर गोळ्या झाडल्या गेल्याची पोलिसांना माहिती मिळाली होती. यानंतर, त्यांना गाझियाबादच्या यशोदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिस बदमाशांचा शोध घेत आहेत. यांना लवकरच अटक केली जाईल.