शहीद पोलिसाच्या पत्नीचा संताप अनावर, म्हणाल्या – ‘मी माझ्या हातांनी विकास दुबेला गोळी घालेन’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कानपूर येथील बिकरू गावात 8 पोलीस कर्मचाऱ्यांचा खून करून फरार असलेल्या, ज्याच्यावर अडीच लाखांचे बक्षीस आहे असा विकास दुबे (History Sheeter Vikas Dubey) याचा शोध सुरू आहे. कानपूरमध्ये 2 जुलै रोजी रात्री पोलिस पथकावर झालेल्या हल्ल्यात झाशी येथील भोजला गावात राहणारे पोलीस शिपाई सुलतान सिंह वर्मा शहीद झाल्यानंतर पत्नी आणि कुटुंबाचा संताप अजून थांबलेला नाही. शहीदच्या पत्नीने सांगितले की, मारेकरी विकास दुबे याचे एनकाउंटर त्यांच्या समोर व्हावे. कारण मला माझ्या स्वत:च्या हातांनी त्याला संपवायचे आहे. पोलिस खात्याच्या मिली भगतमुळे हे निर्घृण खून झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच त्या म्हणाल्या की विकास दुबे पकडला जाईल असे मला वाटत नाही.

पत्नीने सांगितले की विकास दुबे हा तिच्या पतीचा मारेकरी आहे. तो सापडल्यास पोलिसांनी त्याला गोळ्या घालून ठार करावे. केवळ तिच्या नवऱ्याचाच नाही तर त्याने अनेक पोलिसांची निर्भिडपणे हत्या केली आहे. शिक्षेपेक्षा त्याला मृत्यू मिळायला हवा. आतापर्यंत त्याला अटक न झाल्यामुळे पत्नी आणि कुटुंबिय निराश आहेत. त्या म्हणाल्या की लवकरात लवकर पोलिसांनी त्याला अटक करून ठार मारावे. त्याचा वेदनादायक मृत्यू होईपर्यंत संपूर्ण कुटुंब शांत झोपू शकणार नाही.

चकमकीत शहीद झालेल्या पोलीस शिपाई सुलतान सिंह वर्माच्या पत्नीला यूपी सरकारकडून 80 लाख रुपयांचा चेक देण्यात आला आहे. त्याचवेळी प्रभारी मंत्री राम नरेश अग्निहोत्री यांनी शहीदांच्या वडिलांना 20 लाख रुपयांचा चेक दिला. दुसरीकडे सीओसह आठ पोलिसांच्या हत्येनंतर फरार असलेला मुख्य आरोपी विकास दुबे याच्यावरील बक्षिसाची रक्कम आता अडीच लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे.

हा मोठा हत्याकांड घडवून फरार असलेला विकास दुबे याला अटक करणे हे पोलिसांसाठी एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही. 40 पोलिस स्टेशनमधील फोर्स, एक हजाराहून अधिक निरीक्षक, गुन्हे शाखा आणि एसटीएफची टीम त्याचा जागोजागी शोध घेत आहे. 72 तासांहून अधिक वेळ झाला तरी विकास दुबे आणि या हत्याकांडाचे गुन्हेगार पोलिसांपासून दूर आहेत.