संतापजनक ! उपचारासाठी आलेल्या वृद्ध महिलेला सुरक्षारक्षकाची लाथा-बुक्क्यांनी मारहाण

पोलिसनामा ऑनलाईन – कोरोना काळात एकमेकांना मदतीचा हात देत असतानाच उत्तर प्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माणुसकीला काळीमा फासणार्‍या या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली. रुग्णालयाबाहेर गेटवर उपचारासाठी बसलेल्या वृद्ध महिलेला सिक्युरिटी गार्डने बेदम मारहाण केल्याचा भयंकर प्रकार घडला आला.

संबंधित महिला उपचार मिळावेत म्हणून रुग्णालयाबाहेर गेटवर बसून होती. सिक्युरिटी गार्डने महिलेला हुसकवून लावले होते. मात्र तरीही उपचारासाठी ही महिला विनंती करू लागली. संताप अनावर झाल्याने अखेर सिक्युरिटी गार्डने महिलेला लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे. ही संपूर्ण घटना कॅमेर्‍यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान झाला आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे स्वरुपानी ट्रॉमा सेंटर रुग्णालयाच्या गेट बाहेर घडली आहे. हे रुग्णालय पोलीस चौकीपासून पावलाच्या अंतरावर आहे. कोरोनाच्या काळात मदत करायची सोडून अशा पद्धतीने सुरक्षारक्षकाने महिलेशी केलेल्या वर्तवणुकीमुळे सोशल मीडियावरून लोकांनी संताप व्यक्त केला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने सिक्युरिटी गार्डवर निलंबनाची कारवाई केली. त्याच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल कऱण्यात आली आहे.