छेडछाड नाही तर…सुदीक्षाचा अपघाती मृत्यू ?

पोलिसनामा ऑनलाईन – उत्तर प्रदेशातील बुलंदशहरातील सुदीक्षा भाटी मृत्यू प्रकरणी आता नवीन ट्वीट समोर आला आहे. मुलीची हत्या केल्याचा आरोप वडिलांनी केला होता. त्यानुसार पोलिसांनी दोन तरुणांसह बाइक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्याशिवाय सुदीक्षाची छेडछाडीतून हत्या किंवा अपघात झाला नसून एका टँकरपासून वाचण्याच्या नादात झाला असल्याची शक्यता आहे.

सुदीक्षाच्या मृत्यूचा गुंता सोडवण्याचे काम सध्या पोलीस करीत आहेत. त्यानुसार महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. सीसीटीव्हीच्या सहाय्यानं आरोपींच्या गाडीपर्यंत पोहोचणे शक्य झाले आहे. काकांसोबत नातेवाईकांकडे स्कूटरवरून जात असताना बुलेटवरून काही मुले सुदीक्षाचा पाठलाग करत होती. रस्त्यात बुलेटसवार मुलांनी सुदीक्षाची छेड काढण्यास सुरुवात केली. आरोपी युवक सतत बाइक ओव्हरटेक करत होती. त्याच दरम्यान या मुलांपासून वाचवण्याच्या नादात सुदीक्षानं अचानक गाडीला ब्रेक लावला आणि गाडी घसरली. यात सुदीक्षाचा जागीच मृत्यू झाला होता.