सुट्टीचा मुलांनी सदुपयोग करावा : संजय नायडू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जगावर कोसळलेल्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या संकटामुळे शाळा-महाविद्यालयांना अनिश्चित कालावधीसाठी सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे सुटीच्या कालावधीमध्ये मुले घरी आहेत, त्यांनी सुटीचा सदुपयोग कसा करावा यासाठी धनकवडीतील बालाजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय नायडू यांनी काही टिप्स दिल्या, त्या सर्वांसाठी निश्चितच उपयुक्त ठरतील अशा आहेत.

दररोज सकाळ किवा संध्याकाळ सूर्यनमस्कार घालावे (किमान च). प्राणायाम, अनुविलॉम्म, कपाळ भारती, ओंकार, विपश्यना याचा सराव करावा.

पालकांनी मुलांकडून वाचन करून घ्यावे. ऑनलाईन साहित्य डाऊनलोड करून गोष्टी, कविता, वाचून दाखवता येईल, त्यावर एकत्र बसून चर्चा करावी, संवाद वाढवावा, मोबाईलबरोबर पुस्तकातील वाचनाचा आनंद घ्या, टिपन काढा, पुन्हा लिहून काढा, त्यामुळे स्मरणशक्ती आणि इच्छाशक्ती वाढीस मदतच होईल.

कोरोना व्हायरस विषाणू या बदल माहिती संकलन करून त्याचा उगम, परिणाम, उपाय व आजूबाजूची सद्यस्थितीचे वर्णन लिहून काढता येईल. कोरोनाविषयी चित्रस्वरूपात माहिती मांडता येईल. आपल्याला सेवा देणारी डॉक्टर, नर्स, पोलिसकाका यांचे महत्व लिहावे. स्वतःकरिता दैंदिन नियमावली तयार करावी. आज्ञाधारक, आनंद, समाधान, राष्ट्रहित याकरिता चिंतन करून दिवस व्यतित करावे.

शरीरातील इम्मूनिटी वाढविण्याकरिता व रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सात्विक आहार घ्या. आपल्या मूळे इतर कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे. व्हॉटसअ‍ॅप व सोशल मीडियाद्वारे आपल्या वर्गाच्या ग्रुपवर अक्टिवे राहावे. आपल्या शंका विचारावे व संवाद साधावा. पाळीव प्राण्यांना खाऊ द्या. योग्य आराम करा विश्रांती घ्या. तुमचे वर्तन तुमच्या ध्येय यासाठी सुसंगत ठेवा.मनाच्या पाटीवर लिहून ठेवा, या शिवाय सुटीतील अनुभवसुद्धा शेअर करता येतील, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

You might also like