धक्कादायक ! थुंकण्यासाठी उठलेल्या तरुणाच्या डोक्यात कोसळला इमारतीचा स्लॅब (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन : उमरगाव येथील एका जीर्ण इमारतीचा स्लॅब कोसळून एक तरुण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. संपूर्ण दुर्घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. थुंकण्यासाठी उठला असता इमारतीच्या स्लॅब या तरुणाच्या अंगावर कोसळला. दुर्घटनेतील जखमी तरुणाला उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कॅमेऱ्यात कैद झालेल्या घटनेनुसार, बिल्डिंगखाली हा तरुण फोनवर बोलत खुर्चीवर बसला होता. थुंकण्यासाठी खुर्चीवरून उठत थोडा पुढे गेला, त्याच इतरत्र लक्ष नसताना अचानक इमारतीच्या स्लॅबचा काही भाग त्याच्या अंगावर कोसळला. ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने उचलून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे.