‘वंचित’च्या ‘या’ उमेवाराच्या वचननाम्याची राज्यभर चर्चा !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापू लागले आहे. अनेक राजकीय पक्षांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक वचननामे बनवले आहेत आणि आपल्या पक्षाची पुढील काळातील वाटचाल कशी असेल याबाबत भाष्य केले आहे. मात्र राज्यात सध्या जोरदार चर्चा आहे ती वंचित बहुजन आघाडीचे अहमदनगर दक्षिणचे उमेदवार किरण काळे यांच्या वैयक्तिक वचननाम्याची किरण काळे यांनी नगरमधील मतदारांसाठी स्वत:चा स्वतंत्र वचननामा जाहीर केला आहे. यामध्ये काळे यांनी नुसतीच आश्वासने न देता प्रतिस्पर्धी उमेदवारांची राजकीय कुंडली लोकांपुढं मांडण्याचा पद्धतशीर प्रयत्न आहे. वचननाम्याच्या माध्यमातून त्यांनी मतदारांना एकूण २१ वचनं देखील दिली आहेत. सध्या हा वचननामा समस्त नगरकरांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.

किरण काळे यांनी आपल्या जाहीर नाम्यात दिली आहेत ही वचने

मी कुठल्याही अधिकाऱ्याला चप्पल फेकून मारणार नाही
पत्रकारांना मारहाण करून दहशत माजवणार नाही
राजकीय स्वार्थासाठी जातीय दंगली भडकवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणार नाही
एमआयडीसीतील उद्योजकांकडे खंडणी मागून त्यांना वेठीस धरणार नाही
नगरमधील व्यापाऱ्यांना धमकावणार नाही
मी गुंडगिरी करणार नाही
कधीही पोलीस अधीक्षक कार्यालयावर हल्ला करणार नाही.
कधीही कुणाची कष्टाची प्रॉपर्टी बळकावणार नाही
प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव टाकून भ्रष्टाचार करणार नाही
मी कोणाचे खून करणार नाही

किरण काळे हे नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून अनिल राठोड तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून संग्राम जगताप हे दिग्गज उमेदवार रिंगणात आहेत.

 

visit : Policenama.com