वरुणच्या फॅनकडून गर्लफ्रेंड नताशाला जीवे मारण्याची धमकी

ADV

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड सेलिब्रिटींचे आणि त्यांच्या चाहत्यांचे नाते हे नेहमीच आपण पाहतो. आपल्या आवडत्या अभिनेता किंवा अभिनेत्रीसाठी चाहते काहीही करायला तयार असतात. परंतू चाहत्यांचे हे प्रेम त्यांच्या कधीकधी अंगलट येऊ शकते. अशी अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. अशीच एक घटना अभिनेता वरुण धवनसोबत सध्या घडली आहे. वरुणला भेटता न आल्यामुळे त्याच्या चाहतीनं चक्क वरुणची गर्लफ्रेंड नताशा दलालला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

वरुणची एक चाहती काही दिवसांपूर्वी त्याला भेटायला आली होती. त्यावेळी तिला खूप वेळ ताटकळत बसावं लागलं. त्या दिवशी वरुण त्याच्या कामात खूप व्यस्त होता. बऱ्याच वेळानंतर वरुण तिथं आला मात्र त्यानं कोणालाही भेटयला नाही म्हटला. त्यामुळे ही चाहती भडकली, आणि बराचवेळ वरुणच्या सिक्युरिटी टीमसोबत भांडत बसली. ती चाहती एवढ्यावरच थांबली नाही तर तिनं सुरुवातीला स्वतःला इजा करून घेण्याची धमकी दिली. त्यानंतर शेवटी आक्रमक होत तिनं थेट वरुणच्या गर्लफ्रेंडला जीवे मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, ही चाहती वरुणच्या सिक्युरिटी टीमसोबत तब्बल ४५ मिनीट हुज्जत घालत होती. त्यामुळे या प्रकरणी सांताक्रूझ पोलीस स्टेशनमध्ये संबंधित तरुणीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. वरुणची ही चाहती व्यवसायानं वकील असून ती बऱ्याच दिवसांपासून नताशाचा पाठलाग करत होती. यासंदर्भात जर वरुणचा जवाब नोंदवला गेल्यास त्या चाहतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.