Velvet Bean | पुरुषांच्या समस्यांमध्ये वरदान ‘या’ काळ्या बिया, चमत्कारी गुण करतील हैराण, हृदयापासून मेंदूपर्यंत दिसेल परिणाम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Velvet Bean | कुहिलीच्या बिया ज्यास हिंदीमध्ये कौंच बिज म्हणतात. मराठीत यास खाज कुहिली देखील म्हणतात. या बिया शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. या बियांच्या पावडरचे सेवन पुरुषांसाठी खूप फायदेशीर ठरते. कुहिरीच्या शेंगा असतात. त्यांच्या आतमध्ये जाड काळ्या रंगाच्या बिया असतात. या बियांचे फायदे जाणून घेऊया (Velvet Bean Health Benefits).

कुहिलीच्या बियांचे फायदे

ब्रेन हेल्थ

कुहिलीच्या बियांमध्ये अनेक पोषक घटक आढळतात, असेच एक फायटोन्यूट्रिएंट अमिनो अ‍ॅसिड म्हणजे लेवोडोपा. हे न्यूट्रिएंट डोपामाइन न्यूरोट्रांसमिशन वाढवते. डोपामाइनच्या मदतीने, नर्व्ह सिग्नल ट्रान्समिट करण्यात मदत होते. (Velvet Bean)

स्पर्म काउंट

कुहिलीच्या बियांचे नियमित सेवन केल्याने पुरुषांमधील स्पर्म काउंट वाढतो आणि त्याची क्वालिटी सुधारते. मात्र, तज्ञांच्या सूचनेनुसारच या बियांची पावडर सेवन करावी. या बियांचे सेवन प्रजनन यंत्रणा निरोगी करते.

बॅक्टेरियल संसर्ग

बदलत्या हवामानामुळे बॅक्टेरियाच्या संसर्गाचा सर्वात मोठा धोका असतो. कुहिलीच्या बियांमध्ये आढळणारे घटक बॅक्टेरियाचे संक्रमण रोखतात.

आयर्नची कमतरता –

शरीरात आयर्नची कमतरता ही एक सामान्य समस्या आहे. विशेषतः बहुतेक महिलांना आयर्नच्या कमतरतेचा त्रास होतो. कुहिलीच्या बियांचे सेवन केल्याने शरीरातील आयर्नची कमतरता दूर होते. यामध्ये आयर्न मुबलक असते. तसेच अ‍ॅनिमियापासून बचाव होतो.

मूड स्टॅबिलायझर

जर मूड सतत बिघडत असेल तर कुहिलीच्या बियांचे सेवन लाभदायक ठरते. या बिया मूड स्टॅबिलायझरसारखे काम करतात. त्या डिप्रेशन आणि तणाव यासारख्या मानसिक समस्यांवर नॅचरल अँटीडोस म्हणून काम करतात. यासोबतच मूड स्विंगमध्येही कुहिलीच्या बिया लाभदायक आहेत.

हृदय –

कुहिलीच्या बियांमध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असते. अशावेळी त्यांचे सेवन हृदयाचे आरोग्य
चांगले ठेवण्यासही उपयुक्त ठरते. कुहिलीच्या बिया इतरही अनेक समस्यांवर लाभदायक आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cough Problem | सर्दीत औषध घेणे किती योग्य किंवा किती दिवसानंतर उपचार करावा सुरू?

Prostate Cancer च्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करतात 43 टक्के पुरुष, तुम्ही करू नका ‘ही’ चूक

Constipation | मॅग्नेशियम बद्धकोष्ठता दूर करण्यात परिणामकारक उपाय आहे का? एक्‍सपर्टकडून जाणून घ्या

Diabetes – Mental Disease | ‘या’ मानसिक आजाराला बळी पडतो प्रत्येक दुसरा डायबिटीज रूग्ण,
लक्षात ठेवा ‘या’ महत्वाच्या गोष्टी