‘सुपरमॅन’ सारखा पकडला डु प्लेसीसने झेल, हजारो प्रेक्षकांना स्वतःच्या डोळ्यावर ‘विश्वास’ बसेना (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 466 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेली दक्षिण आफ्रिकेची संपूर्ण टीम 274 रण बनवून ऑल आऊट झाली आणि इंग्लंडने हा कसोटी सामना 191 धावांची जिंकला. मात्र हा सामना लक्षात राहिला तो डु प्लेसीसने पकडलेल्या जबरदस्त कॅचमुळे. या कॅचचा व्हिडीओ सर्वत्र मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

ब्युरन हेंड्रिक्सच्या चेंडूवर डु प्लेसीसने एका हाताने डाय मारत जो रूटचा झेल पकडला आणि इंग्लडने कसोटी सामना जिंकला. वाईड ला जाणाऱ्या चेंडूशी छेडछाड करताना जो रुटने शॉर्ट मारला आणि डु प्लेसीसने एक शानदार झेल टिपला. काही क्षणात ही गोष्ट घडल्याने प्रेक्षांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आणि नेमकं काय झाले हे पाहण्यासाठी प्रेक्षक पुन्हा मैदानाकडे लक्ष देऊ लागले.

इंग्लंडने हा सामना 191 धावांनी जिंकला आणि मालिका 3 – 1ने जिंकली. इंग्लंडच्या पहिल्या डावात 400 धावांना उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेने 183 धावा केल्या. इंग्लंडचा दुसरा डाव 248 धावांवर आटोपला होता.

फेसबुक पेज लाईक करा

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like