home page top 1

उदयनराजे भोसले यांना भाजपनं मंचावर दिली ‘वेगळी’ वागणूक ? फोटो ‘व्हायरल’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उदयनराजे भोसले पहिल्यांदा भाजपच्या व्यासपीठावर गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेसाठी ते पहिल्यांदा भाजपच्या व्यासपीठावर दिसले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात त्यांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा एक फोटो सध्या व्हायरल होत आहे.

या निर्णयावर अनेकांच्या प्रतिक्रिया –
राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस कमजोर झाली असल्याच्या चर्चा आहेत. तसेच त्यांचे बंधू शिवेंद्रराजे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हा ढासळला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे काही जणांनी उदयनराजे यांच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे तर काही जणांनी त्यांचा हा निर्णय वैयक्तिक असल्याचे म्हटले आहे.

काय झाले नाशिकच्या सभेत –
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेसाठी ते पहिल्यांदा भाजपच्या व्यासपीठावर दिसले. यावेळी पंतप्रधान मोदी देखील उपस्थित होते. त्यांनी मोदींचा शिवकालीन पगडी घालून सत्कार केला. तसेच उद्यनराजेंचे देखील स्वागत केले. त्यानंतर मोदींचा एक मोठा हार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी उदयनराजे भोसले यांना स्टेजच्या एका बाजूला उभे केल्याचे या फोटोत दिसून येत आहे. त्यामुळे या फोटोवरून सध्या सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, या फोटोवर नागरिक आणि नेटिझन्स मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. काही जण उदयनराजेंच्या बाजूने बोलत आहेत तर काही जण उदयनराजेंच्या या निर्णयावर टीका करत आहेत. तर काही जण उदयनराजे यांच्या जुन्या व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर अपलोड करत आहेत.

Visit – policenama.com 

Loading...
You might also like