विद्या बालननं तोडल्या ‘बोल्डनेस’च्या साऱ्या ‘मर्यादा’ ! सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार विद्या बालन सध्या आपल्या बोल्ड फोटोमुळं सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानी याला इंडस्ट्रीत 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं त्यानंच ट्विटरवरून विद्याचा हा बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर राडा घालताना दिसत आहे.

डब्बूनं शेअर केलेल्या फोटोत दिसत आहे की, विद्या बेडवर झोपली आहे. एका उशीच्या मदतीनं स्वत:ला कवर केलं आहे. फोटो पाहून लक्षात येत आहे की, विद्या क्लोथलेस आहे. विद्याचा अवतार आणि एक्सप्रेशन दोन्हीही खूप हॉट आहेत. विद्याचा हा फोटो ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. विद्याचा हा बोल्ड अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. सध्या हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या बोल्डनेसचं कौतुकही केलं आहे.

फोटोग्राफर डब्बू रतनानी कायमच कॅलेंडरसाठी फोटोशुट करत असतो. त्याच्या कॅलेंडरवर विद्या 2011 मध्ये पहिल्यांदा दिसली होती. तेव्हा विद्यानं टॉपलेस शुट केलं होतं. यानंतर 2015 ला तर तिनं सर्व मर्यादा तोडत चक्क न्यूड फोटोशुट केलं होतं.

विद्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती एनटीआरच्या बायोपिकमध्ये एनटीआरच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच बसवतारकम नंदमुरी ही भूमिका साकारणार आहे. यासाठी तिनं वजनही वाढवलं आहे. याशिवाय ती शकुंतला देवी या सिनेमातही काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती अक्षय कुमार सोबत मिशन मंगल या सिनेमात दिसली होती. 15 ऑगस्ट 2019 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता.