लष्करी अधिकारी पाहताच त्यानं दिली ‘सलामी’, ‘डॉगी’चा फोटो झाला व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओचा भरपूर साठा असतो. मात्र, काही फोटो आणि व्हिडिओ असे असतात जे थेट तुमच्या हृदयाला भिडतात. अशा गोष्टी तुम्ही वारंवार बघता आणि दुसऱ्यांसाठी शेअरही करता. अशाच प्रकारचा एक फोटो काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो १५ कोअर कमांडर लेफ्टनन्ट जनरल केजेएस ढिल्लन यांनी शेअर केला आहे.

या छायाचित्रात चिनार कमांडरला एक कुत्रा सॅल्यूट करताना दिसत आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार हे छायाचित्र १ जुलैरोजी अमरनाथ यात्रेच्या अगोदर काढण्यात आले आहे. लष्कराच्या अधिकाऱ्यांने सांगितले की, जेव्हा लेफ्टनन्ट जनरल दर्शनासाठी पवित्र गुहेत जात होते, तेव्हा जवळपास ५० मीटर दूर मेनका कर्तव्यावर हजर होती.

जेव्हा कोअर कमांडर तेथे पोहचले, तेव्हा या डॉगीने त्यांना सॅल्यूट केला. भारतीय लष्कराच्या परंपरेनुसार कुणी तुम्हाला सॅल्यूट करत असेल तर तुम्हालाही सॅल्यूट करावा लागतो. यामुळे लेफ्टनन्ट जनरल ढिल्लन यांनीही डॉगीला सॅल्यूट केला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/