लतादीदींचं गाणं गातेय ‘ही’ 2 वर्षांची चिमुरडी, रानू मंडल यांनाही टाकलंमागं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सोशल मीडिया हे एक प्रभावशाली माध्यम बनले आहे. सोशल मीडियावर एखादी पोस्ट टाकताच ती क्षणात सर्वत्र व्हायरल होते. लता मंगेशकर यांच एक गाणं गाताना 2 वर्षांच्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. प्रज्ञा मेधा असं या चिमुरडीचं नाव असून सध्या तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये 2 वर्षांच्या प्रज्ञा लता मंगेशकर यांनी गायलेलं प्रसिद्ध गान ‘लग जा गले गाताना दिसत आहे. तिच्या मधुर आवाजामुळे सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. लग जा गले’ हे गाणं 1964 मध्ये आलेल्या वो कौन थी सिनेमातील हे अजरामर गीत आहे. अभिनेत्री साधना यांच्यावर हे गाणं चित्रीत करण्यात आलं होतं.

काही दिवसापूर्वी स्टेशनवर गाणं गात असतानाचा रानू मंडल यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर तिला खूप प्रसिद्धी मिळाली होती. याच प्रसिद्धीच्या जोरावर तिला प्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशमिया याने आपल्या एका चित्रपटात गाणे गाण्याची संधी दिली होती.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like