home page top 1

घरात घुसलं पुराचं पाणी मग पत्नीनं चालू केली ‘स्विमिंग’, पती पहातच राहिला (फोटो)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील प्रयागराजमध्ये मोठ्या प्रमाणात आलेल्या पुरामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात घुसले आहे. त्यामुळे नागरिक स्वतःचा बचाव करण्यासाठी विविध मार्ग सापडत आहेत. मात्र या पुरासंबंधी एक फोटो समोर आला आहे. येथील एका घरामध्ये पाणी घुसले असता तेथील कपलने न घाबरता या पाण्याचा आनंद घेतला. पतीने एका बाजूने शिडी पकडत पत्नीने या पाण्यात पोहण्याचा आनंद घेतला.

घर में घुसा बाढ़ का पानी ताे पत्नी करने लगी स्वीम‍िंग की प्रैक्ट‍िस

त्याचबरोबर या पाण्यात दोघांनी पोहण्याचा देखील आनंद घेतला. याचा एक व्हिडीओ देखील त्यांनी स्लो मोशनमध्ये रेकॉर्ड केला आहे. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नागरिक देखील याला मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यास मदत करत आहेत. हा व्हिडीओ कोणत्या परिसरातील आहे. याची अद्याप माहिती मिळाली नसली तरी दीड मिनिटाच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोठ्या प्रमाणात मनोरंजन पाहायला मिळणार आहे.

 

घर में घुसा बाढ़ का पानी ताे पत्नी करने लगी स्वीम‍िंग की प्रैक्ट‍िस

सध्या प्रयागराजमधील गंगा आणि यमुना नद्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला असून यामुळे हजारो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुराचा मोठा फटका येथील नागरिकांना बसला आहे. दरम्यान, एका बाजूला पुराच्या पाण्याने नागरिक हैराण असताना दुसऱ्या बाजूला या कपलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

visit : Policenama.com 

Loading...
You might also like