IPL-13 : दुबईत असा दिसला विराट कोहली, RCB ने शेयर केला फोटो

युएई : रोज वर्कआऊंट करण्याच्या बाबतीत विराट कधीही मागे हटत नाही. आपल्या शानदार फिटनेससाठी प्रसिद्ध असलेला कोहली दररोज आपल्या फिटनेसवर भरपूर मेहनत घेतो.

आयपीएलच्या 13व्या सीझनसाठी दुबईत पोहचलेल्या कोहलीने वेळ वाया घालवला नाही आणि हॉटेलच्या रूमच्या आतमध्येच आपली फिजिकल ट्रेनिंग सुरू केली.

आयपीएलची टीम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुने आपल्या कॅप्टनचा एक फोटो शेयर केला आहे आणि कॅपशन लिहिले आहे, कॅप्टन कोहलीसाठी एकही दिवस सुट्टी नाही.

कोविड-19 मुळे यंदा आयपीएलचे आयोजन भारतात न करता संयुक्त अरब अमीरात (युएई) मध्ये 19 सप्टेंबरपासून 10 नोव्हेंबरदरम्यान करण्यात आले आहे.

यावेळी आयपीएल प्रेक्षकांशिवाय रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. आयपीएलची सुरूवात 29 मार्चपासून होणार होती, परंतु कोविड-19 मुळे ती अनिश्चित कालावधीसाठी रद्द करण्यात आली होती.

टी-20 वर्ल्ड कप स्थगित झाल्यानंतर आयपीएलसाठी बीसीसीआयने विंडो काढली.

विराट कोहली आपल्या टीम रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (आरसीबी) ला पहिल्यांदा चॅम्पियन बनवण्यासाठी उत्सुक आहे. कोहलीच्या कॅप्टनशीपमध्ये आयपीएल फ्रेंचायजी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु लीगच्या इतिहासात आतापर्यंत तीन वेळा फायनलमध्ये पोहचली आहे, परंतु तिने आतापर्यंत एकसुद्धा ट्रॉफी मिळवलेली नाही आणि तीनवेळा तिला उपविजेता म्हणून समाधान मानावे लागले आहे.