…म्हणून पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही विराट कोहली करणार नाही ‘मतदान’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील उद्या मतदान होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेळाडू अभिनेते यांनाही मतदान करावे म्हणून आवाहन केले आहे. मात्र पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली मतदान करू शकणार नाहीये.

शंभर टक्के मतदान व्हावे यासाठी निवडणूक आयोग तसेच, सत्ताधारी, विरोधी पक्षही तयारी करत असतात. याचदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान करावे म्हणून ट्विटरच्या माध्यमातून जनते बरोबरच नेते, खेळाडू, अभिनेते यांनाही आवाहन केले आहे. पंतप्रधानांनी केलेल्या ट्विट मध्ये महेंद्रसिंह धोनी, कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा यांचे नाव घेऊन मतदानाचे आवाहन केले आहे. मात्र पंतप्रधानांनी आवाहन केले तरी विराट कोहली मतदान करू शकणार नाही.

विशेष म्हणजे, विराटच्या टीमने मतदान यादीत नाव नोंदवण्यासाठी अनेक वेळा फोनवरून प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, आपल्या मुंबईच्या पत्त्यावर मतदान कार्ड बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी अर्जही केला होता. मात्र मतदार यादीत नाव नोंदवण्याची वेळ निघून गेल्याने विराट कोहलीच्या नावाचा समावेश मतदान यादीत होऊ शकला नाही. अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे विराट कोहली या निवडणुकीत मतदान करू सहकणार नाही.