सुहागरात्रीला ‘संबंधा’दरम्यान ‘नकली’ रक्त दाखविण्यासाठी ‘ऑनलाईन’ विकल्या जातात ‘कॅप्सुल’ ! सोशल मीडियावर लोकांचे ‘सवाल’

पोलिसनामा ऑनलाइन –आजही अनेक ठिकाणं अशी आहेत जिथं महिलांवर पहिल्या रात्री व्हर्जिनिटी सिद्ध करण्याचा दबाव असतो. शारीरिक संबंध न ठेवताही महिलांची व्हर्जिनिटी ब्रेक होते. तरीही अनेकदा त्यांना व्हर्जिनिटी सिद्ध करावी लागते. अशा महिलासांठी अनेक कंपन्या व्हर्जिनिटी कॅप्सुल आणि आर्टीफिशियल हायमेन बनवताना दिसत आहेत. ही कॅप्सुल ऑनलाईन उपलब्ध आहे. सर्वात मोठी ऑनलाईन साईट अ‍ॅमेझॉनवरही ही कॅप्सुल विक्रीस होती. यावरून आता सोशल मीडियावर वाद सुरू आहे.

लोकांनी आता या ब्लड कॅप्सुलवरून सवाल उपस्थित केले आहेत. लोक म्हणत आहेत अशा प्रकारच्या कॅप्सुल विकण्यात काय अर्थ आहे. काय अ‍ॅमेझॉन व्हर्जिनिटीच्या अनेक वर्ष जुन्या परंपरेला प्रोत्साहन देत आहे का. अनेक प्रकारे वाद झाल्यानंतर आता अ‍ॅमेझॉननं मात्र याच्या विक्रीवर स्थगिती आणली आहे.

अ‍ॅमेझॉनवर कॅप्सुलबद्दल असा दावा करण्यात आला होता की, अशा प्रकारच्या कॅप्सुल नॅचरल आणि सेफ असतात. व्हजाईनल हेल्थवर याचा काहीही वाईट परिणाम होत नाही. नैसर्गिक सामग्री वापरूनच ती तयार केली जाते. अनेक जडीबुटी वापरून ती बनवली जाते. यासाठी पुढी सामग्री वापरली जाते. परंतु हेही एक सत्य आहे की, देशातील काही ठिकाणी आजही व्हर्जिनिटी टेस्ट जीवन आणि मरणाचा प्रश्न आहे.