Vishal Patil | ‘स्वातंत्र्यांच्या लढाईत चड्डीवाले इंग्रजांसोबत होते, आम्हाला विकत घ्यायला BJP ला अनेक ….

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील (Vishal Patil) यांनी आज भाजपवर हल्लाबोल केला आहे. वसंतदादा घराण्याला विकत घ्यायला भाजपला (BJP) अजून घोटाळे करावे लागतील, अंबानीसारखे उभे करावे लागतील. स्वातंत्र्याच्या लढाईत चड्डी घातलेली लोकं इंग्रजांबरोबर होती. दुर्दैवाने आपल्या नाकर्तेपणामुळे त्यांना दिल्लीचे तक्त मिळाले, अशा शब्दात विशाल पाटील (Vishal Patil) यांनी टिकास्त्र सोडले आहे. त्यावेळी ते सांगलीत (Sangli) कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

विशाल पाटील यांची निवड महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदी (Maharashtra Pradesh Congress Vice President) करण्यात आली आहे. ही निवड काही दिवसापुर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. दरम्यान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्षपदाची जबाबदारी विशाल पाटील (Vishal Patil) यांनी स्वीकारली.यापुढील काळात कार्यकर्ते आणि स्वतःच्या ताकतीच्या जोरावर पद आणि उमेदवारी मिळवू,असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. उपाध्यक्ष पदाच्या निवडीनंतर दिशा संवाद कार्यकर्ताच्या मेळाव्यातून त्यांनी जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्याचा निर्धार केला.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

 

त्यावेळी बोलताना विशाल पाटील (Vishal Patil) म्हणाले, भाजपला अजून खूप घोटाळे करावे लागतील, अंबानी अदानी तयार करावे लागतील. वसंतदादा घराण्याला विकत घ्यायला.
कारण या घराण्याचं राजकारण सत्तेवर टिकले नाही. वसंतदादा यांचे विचार पैशाने निर्माण झाले नाही.
विचाराने गर्दी होते, असे ते म्हणाले. मला बाहेरच्या पक्षातून खूप फोन आले.
भांडणं लागली काँग्रेसमध्ये, पण मी मागच्यावेळी सुद्धा सांगितले होते की, वसंतदादा घराण्याला विकत
घ्यायला भाजपला अजून खूप घोटाळे करावे लागतील अंबानी अदानी तयार करावे लागतील, असं विशाल पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पुढे ते म्हणाले, काही लोक बसले आहेत जे देश चालवतात, देश चालवतात म्हणजे त्यांचा जुना राग काढत आहेत.
या स्वातंत्रच्या लढाईत ही आरएसएसची चड्डी घातलेली लोकं इंग्रजांबरोबर होती.
दुर्दैवाने आपल्या नाकर्तेपणामुळे त्यांना दिल्लीचे तक्त मिळाले आहे.
ते दिल्लीचे तक्त काढून घ्यायचे असल्याने आपल्याला काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्षपद दिलं असल्याचं ते म्हणाले.

Web Title : Vishal Patil | the bjp will have to raise many ambanis to buy us said grandson of vasantdada patil vishal patil at sangli maharashtra

 

Coronavirus in Maharashtra | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 4,755 ‘कोरोना’मुक्त, 4,342 नवीन रुग्ण

Pune Ganeshotsav 2021 | पुण्यात गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट, यंदा श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराने घेतला ‘हा’ निर्णय (व्हिडीओ)

Pune Lohmarg Police | 13 वर्षापूर्वी हरवलेला मुलगा पुणे लोहमार्ग पोलिसांमुळे कुटुंबात परतला